Diwali gift to MPs : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना राज्य सरकारने शुक्रवारी मोठे दिवाळी गिफ्ट दिले. पाचही खासदारांना सरकारने प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शेत/पाणंद रस्त्यांची कामे लोकसभा मतदारसंघात करता येणार आहेत.
महसूल विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार केवळ धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ-वाशिम आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांसाठीच्या निधीलाच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या मतदारसंघ क्षेत्रातच हा निधी खर्च होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रत्येक मतदारसंघाला पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार संजय दिना पाटील या सहा खासदारांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरेंना धक्का देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून निधी मिळावा, या कारणास्तव पक्षांतर केल्याचे या खासदारांकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. विरोधी पक्षात असलेल्या निधी मिळत नव्हता. लोकांची कामे होत नव्हती, असे ओमराजे यांनीही सांगितले होते.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या खासदारांना मागील काही महिन्यांत विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आताही दिवाळीतच प्रत्येकी पाच कोटी रुपये सरकारने दिले आहेत. या निधीतून खासदारांनी सुचविलेलीच कामे होणार असल्याचे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.