

UP Education Minister news : शाळेमध्ये असताना झालेल्या मैत्रीचे रुपांतर आता आयुष्यभराच्या नात्यात होणार आहे. उत्तर प्रदेशचे शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) संदीप सिंह यांचा विवाह शाळेतील मैत्रीण मेघना चौधरी यांच्यासोबत होणार आहे. दिवाळीनंतर १४ नोव्हेंबर रोजी दोघांचा साखरपुडा होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह हे संदीप सिंह यांचे आजोबा आहेत. त्यामुळे या विवाहाची राज्यात बरीच चर्चा होत आहे.
संदीप सिंह आणि मेघना चौधरी यांच्या मैत्रीची सुरूवात दिल्लीतून झाली होती. मेघना यांचे कुटुंब मुळचे अलीगढचे असून सध्या गाझियाबादमध्ये वास्तव्यास आहे. दोघेही दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. संदीप यांनी २०१२ मध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही शाळा सोडली. पुढे मेघना या कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्या.
शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीप आणि मेघना यांचे शिक्षण आणि आयुष्य मार्ग पूर्णपणे बदलले होते. पण शाळेतील ओळख कायम होती. ही ओळखीने त्यांना आयु्ष्यभराचा जोडीदार मिळवून दिला. संदीप सिंह यांनी शाळा सोडल्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे २०२४ मध्ये दोन्ही कुटुंबामध्ये विवाहाच्या चर्चा सुरू झाल्या. संदीप सिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मेघना यांच्या गाझियाबाद येथील घरी जाऊन लग्नाची बोलणी केली.
सुरूवातील कुटुंबातील काही मतभेदांमुळे लग्नाची बोलणी थांबली होती. पण दोन्ही कुटुंबात काही काळाने सहमती झाल्याने लग्न ठरले. आता १४ नोव्हेंबर रोजी दोघांचा साखरपुडा होत आहे. या सोहळ्याला खुद्द मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अलीगढ येथे हा सोहळा होणार आहे. तर २७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, मेघना यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही. त्यांचे आजोबा नौदलातून निवृत्त झाले असून वडील ठेकेदारीचा व्यवसाय करतात. तर संदीप सिंह यांना मात्र मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा कल्याण सिंह हे मुख्यमंत्री होते. पुढे संदीप सिंह हे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहे. ते अलीगढमधील अतरौली विधानसभेचे आमदार असून योगी सरकारमध्ये बेसिक शिक्षण राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र पदभार) जबाबदारी सांभाळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.