NCP merger news : दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार होतं, तारीखही ठरली होती, आता..! सुनील तटकरेंचं पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान

Sunil Tatkare, Ajit Pawar, Sharad Pawar, NCP factions : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत विलीनीकरणावर चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडून तारीखही सांगितली जात होती.
Sunil Tatkare on NCP Merger
Sunil Tatkare on NCP MergerSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP merger talks update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील रुग्णालयात भेट घेतली. या भेटीत झाल्याच्या चर्चेचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्याचे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार-पटेल भेटीनंतर केलेल्या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रफुल पटेल हे गुरूवारी शरद पवारांना रुग्णालयात भेटले. या भेटीमध्ये दोघांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाली होती. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या चर्चेत दहा तारखेनंतर भेटीबाबत शरद पवार म्हणाल्याचे दिसते.

आता तटकरे यांनी विलीनीकरणाची चर्चा त्यावेळी निश्चितपणे झाली होती, असे पहिल्यांदाच जाहीरपणे मान्य केले आहे. अजितदादांनी मला त्याची पूर्णपणे कल्पनाही दिली होती. कशापध्दतीने विलीनीकरण होईल, हे सांगितले होते. अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. त्यांच्या अपघाती निधनामुळे तो विषय तिथेच थांबला. आज दादा असते तर विलीनीकरण झाल्याचे पाहायला मिळाले असते, असे तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare on NCP Merger
OBC Creamy Layer : ओबीसी क्रिमीलेअरवर सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल; केंद्र सरकारची याचिका फेटाळली, पालकांच्या उत्पन्नावरून होता वाद...

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी विलीनीकरणावर चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडून तारीखही सांगितली जात होती. बैठकीचा एक व्हिडिओही समोर आला होता. मात्र, तटकरेंसह इतर नेते अशी चर्चा झाली नसल्याचे सांगत होते. अखेर शुक्रवारी तटकरे यांनी पहिल्यांदाच आपल्याला विलीनीकरणाच्या चर्चेची पूर्ण माहिती असल्याचे सांगितले आहे. त्यांनी विलीनीकरणाची तारीखही सांगितली.

Sunil Tatkare on NCP Merger
Minister Wedding News : शाळेत असताना मैत्री, आता शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्याच मैत्रिणीशी ठरलं लग्न...

दरम्यान, तटकरे यांच्या या विधानावर शरद पवारांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आधी तटकरे विलीनीकरणावर चर्चा झाली नाही, असे का म्हणत होते. ते कुणाच्या दबावाखाली होते, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे. तटकरे हे आताच विलीनीकरणावर का बोलले? असा प्रश्न करत देशमुख यांनी विलीनीकरणाची सध्या कुठलीही चर्चा नसल्याचीही स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.