राहुल क्षीरसागर
Thane Politics : आगामी ठाणे महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विरोधी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. कळवा शहरात जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू समजले जाणारे माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आपली पत्नी ऋता आव्हाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'आव्हाड एवढे घाबरलेले आहेत की त्यांच्यासोबतच्या लोकांना विचारावे लागते की ते खरोखर त्यांच्यासोबत आहेत की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांच्या कुटुंबालाच विरोधात उभं रहावं लागत आहे. आज त्यांची अवस्था अशी झाली आहे की उभे राहिले तरी थरथर कापतात. त्यांनी आमच्यावर टीका करण्याआधी स्वत: स्थिर राहता येते का ते पाहावे.'
चाकण तसेच काही ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. त्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, दिवंगत आमदारांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला आहे. मालवणमध्ये स्थानिक आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार लढविल्या जात असतात. पक्ष म्हणून बऱ्याचशा ठिकाणी निवडणुका लढविल्या जात नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
रायगडच्य राजकारणात भरत गोगावले विरुद्ध सगळे असे चित्र निर्माण झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोगावले यांना घेरण्यात आले आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भरत गोगावलेंना धक्का देणारी तयारी त्यांच्या विरोधकांनी केली आहे. त्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, गोगावले यांच्या विरोधात कितीही जण एकत्र आले तरी त्यांना तोंड देण्यास ते सक्षम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.