

श्रद्धा सावंत-भोसले यांना मराठी नीट बोलता येत नसल्याच्या चर्चेतून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी जोरदार पलटवार केला.
राणे म्हणाले की, “आमच्या जिल्ह्यातील माता-भगिनींची बदनामी सहन केली जाणार नाही” आणि २ तारखेला सावंतवाडी उत्तर देईल.
Sindhudurg Political News : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेंच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. पण त्याआधीच शांतता आणि सुंदरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक सावंतवाडी शहरात राजकारणाला उकळी फुटताना दिसत असून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. येथे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिलेल्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या मराठी बोलण्यावरून आता वाद सुरू झाला आहे. तर याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी विरोधकांना थेट इशारा देत 3 डिसेंबरला जनताच उत्तर देईल असे म्हटले आहे. तर हा मुद्दा उचलणाऱ्या केसरकर यांच्यावर देखील पलटवार करत टोला लगावला आहे.
जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपने सावंतवाडीच्या खेम-सावंत राजे घराण्यातील श्रद्धा लखन सावंत भोसले यांना उतरवले आहे. यामुळे येथे महायुतीत वाद निर्माण झाला असून शिंदेंच्या शिवसेनेनं यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर नगराध्यक्षाचा अर्ज भरल्यानंतर श्रद्धा भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्रद्धा सावंत भोसले या राजघराण्यातील आणि उच्चशिक्षित असून त्यांना मराठी बोलता आले नाही. त्यांना अर्ज दाखल केला की तो घातला हे देखील त्यांना सरळ बोलता आले नाही. त्यांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून त्यांना ट्रोल केलं जात आहे.
केसरकर यांनी आपली भूमिका मांडली होती. केसरकर यांनी, श्रद्धा सावंत भोसले यांना मराठी बोलता येत नाही हे त्यांनी दिलेल्या व्हिडीओतून पहायला मिळालं. त्यांना मराठी बोलता येत नसल्यामुळे कमी बोलत असतील, असेही केसरकर म्हणाले. तर आपण राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नसून त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही असा एकदाच उल्लेख फक्त जिल्हाअध्यक्ष संजू परब यांनी केला होता. पण नितेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती पुरविली गेल्याने त्यांचा गैर समज झाला असावा असे ते म्हणाले होते.
यावरून आता वाद सुरू झाला असून नितेश राणे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. ते श्रद्धा सावंत-भोसले यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच श्रध्दा सावंत भोसले या मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असून त्या लग्न करून सावंतवाडीत आल्या आहेत. आता त्या सावंतवाडीकर झाल्या असून आपली सस्कृती शिकत आहेत.
पण फक्त निवडणुकांसाठी हा मुद्दा हातात घेणं, याचे राजकारण करणे योग्य नाही. निवडणुका येतील जातील मात्र आमच्या जिल्ह्यातील माता-भगिनींची अशा प्रकारे बदनामी कोणी करू नये. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, याचं उत्तर सावंतवाडीकर निकालातून देतील. तर श्रद्धा सावंत-भोसले या मराठी भाषा शिकत असून त्या चांगल्या मराठी बोलतात, असे म्हणत राणेंनी केसरकरांसह श्रद्धा सावंत-भोसले यांना ट्रोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
तसेच त्यांनी यावेळी केसरकर यांच्या निशाणा साधताना त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असेही म्हटलं आहे. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर दीपक केसरकर यांच्याकडून विरोधाची अपेक्षा नव्हती. उलट त्यांचे राजघराण्याशी जवळचे नातं आहे. सावंतवाडीला राजघराण्यानं भरपूर दिलं आहे. दीपक केसरकर यांनाही आशीर्वाद दिलाय. त्यामुळे ही निवडणूक राजकारणाच्या पलिकडे जावून बघायला पाहिजे होती. बिनशर्त पाठिंबा देत राजघराण्याची परतफेड करायला हवी होती.
सावंतवाडीची अस्मिता ही खेम-सावंत राजे राजघराण आहे. याच घराण्याने येथे आरोग्य, पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. अशावेळी या घराण्याच्या व्यक्तीला सगळ्या राजकीय पक्षांनी साथ देण आवश्यक होते. पण तसे झाले नाही. राजघराण्यानं कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे उत्स्फूर्तपणे प्रत्येकानं बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी पुढे यावं असेही त्यांनी आवाहन केलं आहे.
FAQs :
श्रद्धा सावंत-भोसले यांना मराठी येत नाही या चर्चेवर दीपक केसरकर यांनी टिप्पणी केली.
राणेंनी केसरकरांवर पलटवार करत जिल्ह्यातील महिलांची बदनामी सहन करणार नसल्याचे सांगितले.
केसरकर म्हणाले की त्यांनी राजघराण्यावर टीका केलेली नाही, काहींनी चुकीची माहिती दिली.
होय, हा वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच चिघळला आहे.
नितेश राणे म्हणाले की सावंतवाडीकर २ तारखेला या गोष्टीचे उत्तर देतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.