Mumbai political news : हिंदी भाषा सक्तीचा दोन्ही अध्यादेश रद्द झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली.
राज्याचे महायुती सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर महायुती सरकारने हिंदी भाषा सक्ती रद्दचा घेतलेला निर्णय विरोधकांना बळ देणारा ठरला असला, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला चांगलंच डिवचलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "विरोधी पक्षनेते दिलं नाही यावरून, विरोधक गळा काढत आहेत. लोकशाहीमध्ये गळा घोटळा, अशी विरोधी पक्षनेते पदावरून विरोधक ओरड करत आहे. विरोधकांचे गट आहे. पक्ष नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद देता येत नाही".
महाराष्ट्राने (Maharashtra) त्यांना तेवढं संख्याबळ दिलं आहे. ही लोकांची चूक आहे. आमची नाही. सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कामाला चांगलं म्हणत नाही. सातत्याने चांगल्या कामाला विरोध केला जात आहे. अधिवेशनात आम्ही तयार आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांविरुद्ध, एकप्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाविरोधात टायमिंग साधल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना गेल्या अधिवेशनात देण्यात आले होते. या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी केली होती.
यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत मोठा पाठपुरावा केला होता. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाचे किमान 10 टक्के आमदार निवडून यावे लागतात, अशी तरतूद नियमात नसल्याची आमची माहिती असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला होता.
10 टक्के सदस्य संख्येच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीचा सन्मान करावा. दिल्लीच्या 70 सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे 67 आणि भाजपचे केवळ 3 आमदार निवडून आले होते. तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केला, याची आठवण देखील भास्कर जाधव यांनी करून दिली.
परंतु, महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशनावर सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घेतला. तसेच कॅबिनेट बैठकीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्दचा निर्णय झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.