
Satyajeet Tambe BJP relations : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते अधिक संपर्कात असतात. त्यामुळे या चर्चांना बळ मिळते.
मध्यंतरी सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांना एक तासात संपर्क साधून, त्यांची भेट घेऊन दाखवावी, असं चॅलेंज केलं होते. त्यामुळे त्यांची भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे आणि भाजपमधील 'मेख' सांगितली.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधला. महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणावर विखे पाटलांनी परखड भाष्य केले. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर देखील त्यांनी मत मांडलं. यातच नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करतील का? यावर देखील भाष्य केले.
सुजय विखे पाटील म्हणाले, "सत्यजीत तांबे हे भाजपकडे नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे झुकले आहेत. फडणवीससाहेबांचे व्यक्तिमत्व, असे आहे की, जे तरुण सुशिक्षित आहेत, तरुण राजकारणामध्ये काही, तरी करू इच्छितात, त्यांच्याबरोबर बसून चर्चा केली, तर त्यांचा कल फडणवीसांकडेच आहे". आम्ही जेवढे युवक आहोत, काँग्रेस असो किंवा इतर पक्षांमध्ये, आजही तिथं माझे मित्र आहे. आज सगळ्यांचा कल फडणवीसांकडेच आहे, असे सुजय विखे पाटलांनी म्हटले.
'सत्यजीत तांबे यांना ठोकून विचारलं तरी, ते भाजपची विचारसरणी मान्य करणार नाही. ते जास्त झुकले आहेत, ते फडणवीस साहेबांकडे! पण, तेच याबाबत जास्त सांगू शकतात, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
'महाराष्ट्रात जे भाजपबरोबर लोकं आहे, किंवा इतर पक्ष आहे, किंवा गुवाहाटीमध्ये ज्याप्रमाणात लोकं गेले, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या कौशल्याचा मोठा वाटा होता. माझं भाजपकडे जाणं देखील त्याचाच भाग आहे. त्या विचारसरणीत मी हळूहळू रुळत आहे. पण मी आजही विकासाला मत मागतो, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.