Prakash Ambedkar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar News : शिवसेनेने भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला; प्रकाश आंबेडकर ठरले किंगमेकर...

Ulhasnagar Municipal Corporation : साई पक्षाच्या दिप्ती दुधानी आणि ओमी कलानी समर्थक सविता तोरणे रगडे शिवसेनेकडे गेल्याने शिवसेनेची संख्या ३८ वर पोहोचली होती

Rajanand More

Eknath Shinde BJP setback : महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता काही ठिकाणी महापौर आपल्याच पक्षाचा असावा, यासाठी सर्वच पक्षांनी लॉबिंग सुरू केले आहे. उल्हासनगर महापालिकेतही महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतच टशन सुरू आहे. दोन्ही पक्षांना बहुमतासाठी अनुक्रमे तीन आणि चार नगरसेवकांचीच आवश्यकता असून त्यासाठी इतर पक्षांचे नगरसेवळ गळाला लावले जात आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपने ३७ नगरसेवक निवडून आणत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्याचवेळी शिवसेना-टीओके साई पक्षाच्या दोस्ती का गठबंधनने ३६ नगरसेवक निवडून आणले आहेत. महापौर पदासाठी आवश्यक असलेली ४० ही 'मॅजिक फिगर' दोन्ही आघाड्यांकडे नसल्याने सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

दरम्यान, साई पक्षाच्या दिप्ती दुधानी आणि ओमी कलानी समर्थक सविता तोरणे रगडे शिवसेनेकडे गेल्याने शिवसेनेची संख्या ३८ वर पोहोचली होती. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना बहुमतापर्यंत पोहोचली आहे. परिणामी शिवसेनेच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा सोनवणे व विकास खरात यांनी पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या हातून उल्हासनगरची सत्ता निसटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्या खेळीने भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास निसटला आहे. यामध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर किंगमेकर ठरले आहेत.

उपमहापौरपद वंचितला?

उल्हासनगर महापालिकेत महापौर पद कोणाच्या हाती जाणार, यावर अद्याप अनिश्चितता कायम असली तरी उपमहापौर पदाची लॉटरी वंचित बहुजन आघाडीला लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास आंबेडकरी चळवळीला तिसऱ्यांदा उपमहापौर पदाचा मान मिळणार आहे.

वंचितची भूमिका

प्रकाश आंबेडकर यांनी सुरूवातीपासूनच भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्यास नेते व पदाधिकाऱ्यांना मोकळीक दिली आहे. त्यानुसार दगडापेक्षा वीट बरी असे सांगत ठाणे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा घेण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत मुंबईसह अन्य काही ठिकाणी वंचितने काँग्रेससोबत आघाडी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT