Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वित्झर्लंडमधून मुंबईबाबत महत्वाची घोषणा; मोठ्या बदलाचे दिले संकेत...

BMC Election update : २०३० साली जगातील कुठल्याही राष्ट्राची जी राजधानी आहे, त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई पुढच्या पाच वर्षातच आपल्याला तयार झालेली दिसेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai infrastructure reforms : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने विजय मिळविल्यानंतर आता महापौरपदाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र, या धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड गाठले आहे. आजपासून पुढील पाच दिवस ते दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. तिथे जाऊन त्यांनी मुंबईत मोठा बदल होणार असल्याची घोषणा केली आहे.

स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांमधील विजयाचा उल्लेख केला नाही. मात्र, पुढील पाच वर्षांत मुंबईत कसे बदल होतील, याबाबत सूचक विधान केले आहे. मुंबईप्रमाणेच त्यांनी पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या शहरांचीही उल्लेख केला.

फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तयार झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. पुढील काळात मुंबई आपण आणखी ट्रान्सफॉर्म करणार आहोत. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, आजपासून तुम्ही जेव्हा मुंबईला याल, तेव्हा प्रत्येकवर्षी तुम्हाला बदललेली मुंबई दिसेल.

Devendra Fadnavis
Political horse trading : वाजपेयींना घोडेबाजाराची होती चीड, त्याच मार्गावर ‘हा’ खासदार; धुडकावली सत्ताधाऱ्यांची कोट्यवधींची ऑफर

२०३० साली जगातील कुठल्याही राष्ट्राची जी राजधानी आहे, त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई पुढच्या पाच वर्षातच आपल्याला तयार झालेली दिसेल. केवळ मुंबईच नव्हे तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूरमध्येही दिसेल. अतिशय चांगल्याप्रकारे आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही आपली टॅगलाईनच आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जाणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.  

महाराष्ट्र हे भारतातील हे सर्वाधिक समृध्द राज्य म्हणून पाहिले जाते. पण सांस्कृतिकदृष्ट्याही सर्वाधिक समृध्द समाज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने केवळ भौतिकच नव्हे तर सांस्कृतिक समृध्दीही मिळवलेली आहे. खरंतर सांस्कृतिक समृध्दी टिकविल्यामुळेच भौतिक समृध्दी करू शकलो, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Ramdas Athawale RPI : युतीनं जागाच सोडल्या नाहीत, नाईलाजास्तव कार्यकर्ते भिडले; आठवलेंच्या 'रिपाइं'ची अन् आंबेडकरांच्या 'वंचित'ची मुंबईत जोरदार नाचक्की!

आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरकडे चालली असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आतातरी कोणाशी स्पर्धा नाही. कारण महाराष्ट्र या स्पर्धेत खूप पुढे आहे. पुढील तीन वर्षांत भारतातील पहिली ट्रलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राची असेल. एफडीआय, निर्यात, उत्पादन, डेटा सेंटर कॅपॅसिटी, एआय, डिफेन्स उत्पादन स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे. पहिल्या क्रमांकाची ही यादी न संपणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com