Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath shinde : वादाची धग कायम; ठाकरेंची सर्वोच्च तर शिंदे गटाची नार्वेकरांविरोधात हायकोर्टात याचिका

Bharat Gogawale file petition againt Narwekar : आमदार अपात्रता प्रकरण वेगळ्या वळणावर....

Avinash Chandane

Mumbai Political News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल दिला. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असताना या निकालाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल गेली आहे. तर सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनेही नार्वेकरांच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी त्यांच्या निकालात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) असे स्पष्ट केले होते. शिवाय त्यांनी शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गटांचे आमदार अपात्र ठरवले नव्हते. पण हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टात अवमान असल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न ठरल्याने शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात खरी शिवसेना (Shiv Sena) शिंदेंची आहे आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) प्रतोदपदी अधिकृत होते, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. असे असेल तर या गोगावलेंच्या व्हिपप्रमाणे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हायला हवेत, असा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. आणि याचसाठी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी भरत गोगावले यांनी रिपिट पिटीशन दाखल केली आहे. या याचिकेवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आमदार अपात्र प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

विशेष म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर आक्षेप घेतला आहे. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT