Mumbai News : मंगेश सातमकरांनी शिंदेच्या शिवसेनेला मानलं, त्यांनी 'बाळासाहेब भवना'त पाय ठेवला अन् एका महिलेल्या केलेल्या गंभीर आरोपातून त्यांची तासाभराच पाठही सुठली. यामुळे सातमकरांना दिलासा मिळाला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. (Latest Political News)
ठाकरे गटाकडून मंगेश सातमकर अनेक टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान ठाकरे गटाला मोठे शिलेदार सोडून जात असल्याने पुढील काही दिवसांत महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग येऊ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातमकरांनी शिंदेंची साथ धरताच त्यांची एका महिलेने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपातूनही सुटका झाल्याचे पुरावेही व्हायरल होऊ लागले आहेत.
सातमकरांवर काय होते आरोप ?
मंगेश सातमकरांवर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. लग्नाच्या आमिषाने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर सातमकरांवर मे २०२३ मध्ये वडाळा टीटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच संबंधित तरुणीने सातमकरांवर केलेल्या गंभीर आरोप मागे घेतल्याचे पुरावे समोर आले आहेत. 'आमच्यात विसंवादातून तेढ निर्माण झाला होता, तो आता दूर झाला असून सातकरांवरील सर्व आरोप मागे घेत आहे', असे संबंधित तरुणीने २५ जुलै २०२३ रोजी प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे.
प्रवेश करताच ठाकरेंवर निशाणा !
शिंदे गटात जाताच सातमकरांनी पक्षातील वरीष्ठ चर्चांसाठी वेळच देत नसल्याचे सांगून ठाकरेंवर तोफ डागली. सातमकर म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली भेट घेतली त्यावेळी त्यांनी आम्हाला सुमारे दीड तास वेळ दिला. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो त्या-त्या वेळी त्यांनी वेळ दिला. वरिष्ठ चर्चा करत नसतील आणि वेळ देत नसतील तर ती बाब हृदयाला लागते. मी केली अनेक वर्ष शिवसेनेत काम करतोय, पण असा कोणीच इतका वेळ दिला नाही. यातूनच मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे."
कोण आहेत सातमकर ?
सातमकर १९९४ मध्ये पहिल्यांदा मुंबई मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर २००२, २००७, २०१७ मध्ये ते महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांनी जिंकली. सातमकरांनी अनेक वर्षे बीएमसी शिक्षण समितीवर अध्यक्षही राहिले होते. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. स्थायी समिती आणि इतरही अनेक समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. २०१४ मध्ये सातमकरांनी सायन कोळीवाडा मधून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.