Mumbai : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याने विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे हे पद कुणाकडे जाणार यावर दावे - प्रतिदावे केले जात आहेत. याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेमंडळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत मोठं विधान केले.
पटोले म्हणाले, विधीमंडळाची एक व्यवस्था आहेत. त्यात विरोधी पक्षाच्या ज्या पक्षाकडे आमदारांचं सर्वाधिक संख्याबळ असतं त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. आता काँग्रेसकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार आहे. या पुढच्या आठवड्यात विरोधी पक्षनेता पाहायला मिळणार आहे असेही ते म्हणाले.
या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. या बैठकीत 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा झाली.
बैठकीत काय घडलं..?
नाना पटोले(Nana Patole) म्हणाले, पवारांनी पाटणा आणि बेंगळूरु येथे ज्या बैठकी झाल्या तेथील अनुभव आम्हांला सांगितला. इंडियाच्या मुंबई येथील बैठकीत महत्वाचे नेते येत असल्यामुळे या मीटिंगच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक झाली. त्याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी उध्दव ठाकरेंशीही ते फोनवर बोलले. विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि १०० हून अधिक महत्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. म्हणून या बैठकीच्या तयारीसाठी ही मीटिंग झाली असेही पटोले म्हणाले.
१५ ऑगस्टनंतर आघाडी ताकदीने लोकांसमोर जाणार....
सध्या राज्यात विविध ठिकाणी भरपूर पाऊस कोसळतोय. शरद पवारांनीदेखील त्यांचे दौरे रद्द केले होते. पण आता पंधरा ऑगस्टनंतर सर्वच पक्षांचे पुढील दौरे सुरु होणार आहेत. यात शरद पवार, उध्दव ठाकरेंसह काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचेही दौरे सुरु होणार आहे. यात महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)ही आपल्या ताकदीने जनतेसमोर जाणार आहे असेही पटोले म्हणाले.
'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीचे आयोजक 'मविआ'
लोकसभेसाठी प्रत्येक पक्ष आपआपला होमवर्क करतोय. आणि मीरिटच्या आधारावर सर्व निर्णय घेतले जातील. पण अद्याप या प्रक्रियेला वेळ आहे. ज्या पक्षाचे लोकसभेसाठी जे उमेदवार मजबूत आहे त्यांना सर्वांनीच ताकद द्यायची असं ठरलं आहे. मुंबईतील इंडिया बैठकीचा आयोजक महाविकास आघाडी असणार आहे असल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.