Bharat Gogawle
Bharat Gogawle Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदे संघर्षाच्या पवित्र्यात : ‘अंगावर आले तर शिंगावर घ्या; समर्थकांना सूचना!’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, त्यामुळे दौरे, सभा सुरू आहेत. हल्ले, दहशत हे आम्हाला काही नवं नाही. पण, अंगावर आले तर शिंगावर घ्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यांनी आम्हाला सांगितले आहे, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी सांगितले. दरम्यान, माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ‘आम्ही शांत आहोत, याचा अर्थ घाबरतो. असं नाही. जशास तसं उत्तर देऊ’ असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला. (Eknath Shinde's gave suggestion supporters in the Uday Samant attack case : Bharat Gogawle)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानंतर आमदरार उदय सामंत हे मुंबईकडे जात असताना पुण्यातील कात्रजमध्ये त्यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. त्यावर आमदार गोगावले यांनी प्रतिक्रिया दिला.

गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. ते आम्हाला काही नवं नाही. पण, अंगावर आले; तर शिंगावर घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे आम्ही शांत आहोत, याचा अर्थ घाबरतो असं नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा सामंत यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर दिला.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख ऑगस्ट दिली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना झाल्यावर योग्य निर्णय होईल. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात जोदार युक्तीवाद सुरू आहे. पण, लवकरच गोड बातमी येईल, असं वाटतं. शुभ मुहूर्त जवळ आला आहे. मात्र तो कशा संदर्भात आहे, हे मात्र भरत गोगावले यांनी सांगितले नाही.

शिवसेनेनेकडून राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवा, असे आव्हान दिले जात आहे. त्यासंदर्भात आम्ही तयार आहोत. निवडणुका घ्या, आम्ही निवडणुकीला तयार आहोत, असे आव्हानही भरत गोगावले यांनी या वेळी आदित्य ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यासंदर्भात आमदार गोगावले म्हणाले, मुख्यमंत्रीही माणूस आहेत. शरीर आहे म्हटल्यावर थकणार. थोडा आराम मिळाला तर ठीक होईल, असा आशावादही त्यांंनी या वेळी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT