Prakash Ambedkar |Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Election Commission News: बच्चू कडू अन् प्रकाश आंबेडकरांच्या पक्षांचं ठरलं; 'या' चिन्हावर विधानसभा लढणार

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभेनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजप ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार गट, शिवसेना शिंदे- ठाकरे गट यांच्यासह छोट्या छोट्या घटक पक्षांनी देखील विजयाच्या निर्धाराने आपली तयारी सुरू केली आहे.

त्याचदरम्यान, आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) 'गॅस सिलेंडर'तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला 'बॅट' हे चिन्ह बहाल केले आहे.

जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांसोबत महाराष्ट्राच्याही विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता होती.पण जम्मू काश्मीर आणि हरयाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

तर महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे.त्यामुळे तिथे निवडणुका घेणे अनिवार्य होणार आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने 'गॅस सिलेंडर' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकांत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह मिळाले आहे.

केंद्रीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून 14 ऑगस्ट रोजी एक पत्र जारी केले आले आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह मिळाले आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा 'कप-बशी' चिन्हावर निवडणूक लढवली होती.

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळालं होतं.यानंतर आता प्रहार पक्षाला आगामी निवडणुका बॅट या चिन्हावर लढवाव्या लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रहार जनशक्ती पक्षाला हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे प्रहार पक्ष आता विधानसभा निवडणुका बॅट या चिन्हावर लढवू शकते.

वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. तर भारत आदिवासी पक्षाला हॉकी आणि बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीकडे 'गेमचेंजर' म्हणून पाहिले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT