Sanjay Raut : "56 इंचाच्या छातीतील उरलेली हवा विधानसभेनंतर काढणार..."; संजय राऊतांचा PM मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut On Pm Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती 56 इंचाची आहे, हे ते स्वत: विसरले आहेत. त्यांना छातीच नाही, त्यांच्या छातीतील उरलेली हवा आपण लोकसभेला काढली आहे."
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 August : "पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती 56 इंचाची आहे, हे ते स्वत: विसरले आहेत. त्यांना छातीच नाही, त्यांच्या छातीतील उरलेली हवा आपण लोकसभेला काढली आहे", अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. ते महाविकास आघाडीच्या मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाजप आणि महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला. आम्ही हार मानणार नाही, झुकणार नाही, लढत राहू. हा महाराष्ट्र दिल्लीच्या नव्या हुकुमशाहीविरूद्ध आज उभा आहे तो कधीही झुकणार नाही, वाकणार नाही आणि मोडणार नाही.

मात्र, तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हाच आजच्या मेळाव्याचा खरा मंत्र आहे, असं सांगत त्यांनी विरोधकांना सुनावलं. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मिरमध्ये होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांवरुन पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) लक्ष्य केलं. ते म्हणाले, "मगाशी आपल्या वक्त्यांना प्रधानमंत्र्याच्या 56 इंच छातीची आठवण झाली. पण आता ते स्वत: आपली छाती 56 इंच आहे ते विसरलेत. ती छातीच नाहीये तो माचिसचा रिकामा खोका आहे. त्यात काहीही नाही. नुसती छाती जरी असती तरी देशाची ही अवस्था झाली नसती.

Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut : "भगवा नाहीतर तिरंगा जिंकेल, पिंक जिंकणार नाही..."; गुलाबी रंगावरुन राऊतांनी अजितदादांना डिवचलं

मोदी लाल किल्ल्यावर भाषण करतायत आणि जम्मू-काश्मिरमध्ये जवानाचं बलिदान झालं. गेल्या 50 दिवसांमध्ये 27 अतिरेकी हल्ले झाले. यामध्ये 17 जवान शहीद आणि 56 घायाळ झाले. हे या 56 इंच वाल्यांचं काम नाही. त्यांच्या छातीत उरली सुरली हवा होती ती लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत आपण काढून टाकली आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर ती पूर्णच काढून टाकू", असा घणाघात राऊतांनी केला.

Sanjay Raut, Narendra Modi
Video Jayant Patil: उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्री 'फाईल'वॉर वर जयंतरावांचा हल्लाबोल; अजितदादा न वाचताच सह्या करीत होते...

पिंक जिंकणार नाही

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या गुलाबी रंगावरुन जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. शेजारच्या तेलंगणामध्ये केसीआरचा गुलाबी रंग पराभूत झाला. मी त्यांना एकदा बोललो हा रंग राजकारणात चालत नाही, इथे एकतर भगवा जिंकेल नाहीतर तिरंगा जिंकेल पण पिंक जिंकणार नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे तिरंग्याचं रक्षण भगवा करतो. आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, त्यामुळे पिंक गेला", असं म्हणत त्यांनी अजितदादां टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com