Narendra Modi, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS Politics : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, मनसेने PM मोदींना डिवचले; राज ठाकरेंचा शिलेदार म्हणाला, 'कोणत्या भाषेत...'

MLA Raju Patil Criticizes PM Modi : राजू पाटील म्हणाले की, 'दुसरा प्रश्न हा पडतो की ट्रम्प यांना कोणी सांगितले ? ‘अडाणी’ ने ? जे वीर जवान शहीद झाले व ज्या निष्पाप नागरिकांचा या घडामोडींत जीव गेला त्यांचे काय ?

Roshan More

India-Pakistan Ceasefire : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. पाकिस्तानकडून ही शस्त्रसंधी म्हणजे आपला विजय असल्याचे सांगितले जात आहे. तर, पाकिस्तानने विनंती केल्याने भारताने आपल्या अटींवर शस्त्रसंधी मंजूर केल्याचे म्हटले जात आहे. या शस्त्रसंधीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याची आठवण करून देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राजू पाटील यांनी म्हटले आहे की, 'राजसाहेब ‘सरसकट युद्ध’ हा दहशतवादावर उपाय नाही, तर ‘दहशतवाद्यांना शोधून मारले पाहिजे’ असे बोलले तेव्हा त्यांना प्रचंड ट्रोल केले गेले ? आता त्या अंधभक्तांनी मोदींना विचारावे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री.ट्रम्प यांनी कोणत्या भाषेत मोदींना सांगितले व त्यांनी कारवाई तात्काळ थांबविली ?'

पाटील पुढे म्हणाले की, 'दुसरा प्रश्न हा पडतो की ट्रम्प यांना कोणी सांगितले ? ‘अडाणी’ ने ? जे वीर जवान शहीद झाले व ज्या निष्पाप नागरिकांचा या घडामोडींत जीव गेला त्यांचे काय ? प्रश्न अनेक आहेत,उत्तरं द्यावी लागतील.'

राष्ट्रपतींनी दखल घ्यावी...

शस्त्रसंधीनंतर अवघ्या तीन तासांत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यावरून बोलताना राजू पाटील म्हणाले, पाकने आपल्या स्वभावानुसार लगेचच शस्रसंधीचे उल्लंघन करून आपली जात दाखवली आहे. एकंदरीतच देशातील जनता संभ्रमात आहे, सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहत आहेत. अशा वेळी राष्ट्रपतींनी दखल घ्यायची वेळ आली आहे का ?

पाकिस्तानचे शेपूट वाकडे

शस्त्रसंधीनंतर अवघ्या तीन तासांत पुन्हा हल्ले पाकिस्तानकडून करण्यात आले. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधी हा पाकिस्तानचा विजय असल्याचे म्हटले आहे तसेच शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT