Yunus Government Big Action on Awami League: बांग्लादेशाच्या युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पार्टीबाबत मोठं पाऊल उचललं आहे. शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षावर सरकारने बंदी घातली आहे. दहशतवाद विरोधी कायद्यानुसार ही कारवाई केली आहे. युनूस सरकरच्या या निर्णयाची आवामी लीगचे कठोर शब्दात निंदा केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत आवामी लीगने निवेदन दिले आहे.
युनूस सरकारने घेतलेला हा निर्णय लोकशाहीच्या विरोधात आहे. हा निर्णय हुकुमशाहीसारखा आहे. आम्ही या निर्णयाचा विरोध करीत आहोत, तर दुसरीकडे दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आवामी लीग नेत्याच्या विरोधात इंटरनेशनल क्राइम्स ट्राइब्यूनलमध्ये जोपर्यंत खटले पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पक्षावर बंदी असेल, असे युनूस सरकारने म्हटलं आहे.
बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत इंटरनेशनल क्राइम्स ट्राइब्यूनल कायद्यात सुधारणा करण्यात आली. यात राजकीय पक्ष आणि नेते यांच्याविरोधात खटला चालविण्यास संमती देण्यात आली.
शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी गेल्या वर्षी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला होता. बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी शेख हसीना यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. यूनूस यांच्या पोलिस प्रशासनाने याबाबत मोठा प्लॅन आखला आहे. बांग्लादेश पोलिसांच्या नॅशनल क्राईम ब्युरोने (एनसीबी) इंटरपोलकडे 12 जणांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस काढण्याची मागणी केली आहे. यात शेख हसीना यांचे नाव आहे.
77 वर्षीय शेख हसीना या गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांग्ला देशातून भारतात आल्या होत्या.
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करीत त्यांचे 16 वर्षांचे सरकार पाडलं होते.
शेख हसीना यांच्यासह या 12 जणांवर विविध तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपांच्या आधारे एनसीबीने इंटरपोलकडे हा अर्ज केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.