Sushma Andhare on Crime : Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare on Crime : अंधारेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस; म्हणाल्या, कल्याण डोंबिवलीत गुन्हेगार मोकाट

Kalyan-Dombivali News: पंधरा दिवसांत तीन घटना घडतात ही बाब चिंताजनक आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dombivali Crime : कल्याणमध्ये गुन्हेगारांचा मुक्त संचार आहे. दिवसाढवळ्या मुलीची हत्या, मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न तसेच महिलेवर हल्ला होणे ही चिंताजनक बाब आहे. गृहखात्यातील अधिकाऱ्यांचे हे अपयश असून त्यांची सर्व शक्ती आणि बळ हे सत्तासंघर्ष सावरण्यात वाया जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याची गुंजाइश राहीलेली नाही. कल्याणमध्ये जो आरोपींचा मोकाट्याने मुक्त संचार आहे याला निवळ म्हणजे निवळ सन्माननीय गृहमंत्री महोदय जबाबदार आहेत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृह खात्यावर केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, पंधरा दिवसांत तीन घटना घडतात ही बाब चिंताजनक आहे. याकडे पोलिस अजिबात लक्ष देत नाहीत. इथे भाजप शिंदे गट सत्तासंघर्षाला सावरण्यातच गृहखात्याची एनर्जी वाया जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याची शक्यताही नाही. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांची भेट घेतली. त्यांना विचारणा केली असता सांगितले, त्यांनी असे सांगितले की मुलीच्या आईने आमच्याकडे तक्रार करायला हवी होती.

मुळात ही गोष्ट फार विचारनीय, चिंतनीय आहे. आरोपीला धाक वाटत नाही, भर दिवसा ते वार करतात. तसेच फिर्यादींना पोलिसांबद्दल आपुलकी विश्वास वाटत नाही की फिर्यादींनी गुन्हा दाखल करण्यासाठी यावं. हे सर्व पहाता गृहखातं हे ठरवून काय पद्धतीने काम करत आहे. विशेषतः कल्याण मध्ये गुन्हेगारांचा मोकाट संचार आहे. याला निव्वळ कारण गृहमंत्र्यांनी गृहखात्याची शक्ती, बळ हे फक्त सत्तासंघर्षासाठी वापरण्याचे ठरविले आहे. एकीकडे शिंदे गटाचे लोकप्रतिनिधींना अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाते.

किरीट भाऊ व्हिडीओच्या सदम्यातून अजून बाहेर निघाले नाहीत

कोविड घोटाळा प्रकरणी सुजित जाधव यांना ताब्यात घेतले याविषयी अंधारे म्हणाल्या, आर्थिक गुन्हे शाखा त्यांना वाटेल त्या पद्धतीने वाटेल त्या माणसाला ताब्यात घेते. आठ दिवसांपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन गुन्हे शाखेला मध्यान्ह भोजन घोटाळ्याचे शंभर कोटी पेक्षा जास्त फक्त एका वर्षातील एका जिल्ह्याची कागदपत्र सादर केली. त्यावर ते काय कारवाई करणार आहेत. ते उज्वल पगारीया, विजय जाधव यांच्याच कंपन्यांना गेली अनेक वर्षे कंत्राट का दिले जाते. प्रसाद लाड यांचा काय संबंध आहे. देवेंद्र जी यावर बोलणार का ? आणि किरीट भाऊ व्हिडीओच्या सदम्यातून अजून बाहेर निघाले नाहीत का ? याचा देखील त्यांनी विचार केला पाहीजे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT