Fake Police
Fake Police Sarkarnama
मुंबई

Mumbai Police Arrest Fake Police: अरेरावी करायला गेला अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला; निघाला नकली पोलीस अधिकारी

सरकारनामा ब्युरो

Andheri News: कायद्याचे हात लांब असतात, असे आपण सतत म्हणत असतो. या जोडीला आता पोलिसांची एक नजरच चोरांना ओळखण्यासाठी पुरेशी असते असेही म्हणू शकतो. याचा प्रत्यय पोलिसांनी वारंवार करून दिला आहे. मुंबईत काही दिवसांपासून पोलीस असल्याचे भासवून अनेक व्यावसायिकांना लुटणारी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, असे प्रकार वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी (ता. ११) पूर्व अंधेरीत तोतया पोलिसाला त्याच्या पेहरावावरून ओळखून त्याला ताब्यात घेतले आहे. कैलाश खामकर या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या तोतया पोलिसास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील चकाला मेट्रो स्थानक परिससात एमआयडीसी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका टपरीजवळ पोलीस गणवेशात उभी असलेली एक व्यक्ती दिसली.

त्या व्यक्तीकडे गस्तीवरील असलेले पोलीस उपनिरीक्षक यश पालवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना समोरची व्यक्ती संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी कुठे असता असे विचारले, त्यावेळी आरोपीने आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. त्यावर पालवे यांनी त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात असता, असे विचारले. त्यावर त्याने सीआयडी युनिट जी मध्ये कार्यरत असल्याचे सांगितले.

पालवे त्याला प्रश्न विचारत होते, त्याच वेळी ते आणि त्यांचे सहकारी आरोपीच्या पेहरावाकडेही लक्ष देत होते. आरोपीने अंगात पोलिसाचा युनिफॉर्म, पायात लाल शूज घातला होता. तो सीआयडी युनीटमध्ये असल्याचेही सांगत होता. मात्र त्याच्या डोक्यावरील हेल्मेट वाहतूक पोलिसाचे होते.

त्याचा असा पेहराव पाहून पोलिसांना तो तोतया आहे, तसेच तो पोलिसांच्या वेषात येऊन व्यापारी, नागरिकांची फसवणूक करत असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्याला पालवे यांनी ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. तेथे खाक्या दाखवताच त्याने आपण तोतया पोलीस असल्याचे कबूल केले. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Police पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. आरोपी खामकरने शरीरयष्टीचा फायदा घेण्यासाठी पोलिसांसारखा गणवेश शिवून घेतला. तसेच कैलास खामकर 'एपीआय' अशी नेमप्लेटही बनवली. बोगस ओळखपत्रही त्याच्याकडे आहे.

अंधेरी पूर्व चकाला एमआयडीसी परिसरात त्याने अनेक टपरीधारक, भाजी विक्रेते यांच्याकडून पैसे उकळले आहेत. तसेच पैसे न देणाऱ्या टपरीधाकरांकडून तो मोठ्या प्रमाणावर ब्रॅण्डेड सिगरेटची पाकीट घेत होता. ती पाकिटे तो दुसऱ्या दुकानदारांना विकत होता. दरम्यान, त्याने दुचाकीसाठी वेगवेगळे नंबर प्लेट बनविले होते. (Latest Maharashtra News)

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT