Maratha protesters Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : ‘उपोषणाची घोषणा चार महिन्यांपूर्वी केली होती; सरकारने सुविधा न दिल्याने आंदोलकांचे प्रचंड हाल, ते आरोपी नाहीत’

Manoj Jarange Patil Protest : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जबाबदार वकिलाप्रमाणे वागावे. ते जे माध्यमांना बाईट देतात. त्याचा मनस्ताप आणि क्लेष निर्माण होतो, ते थांबवण्याची गरज आहे, अशी मागणीही वकिलांनी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 September : मनोज जरांगे पाटील यांनी चार महिन्यांपूर्वीच उपोषणाची घोषणा केली होती. पण, ऐनवेळी नियम आणले गेले. उपोषणाच्या दिवशी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आंदोलक हे आरोपी नाहीत. त्यांना अन्न, पाणी, वीज, शौचालय व इतर पायाभूत सुविधा सरकारकडून मिळाल्या नाहीत, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. विशेष म्हणजे आंदोलकांच्या वाईट गोष्टीच दाखवल्या जातात, चांगल्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. आम्ही आमची बाजू उद्या पुन्हा जोमाने मांडू, असेही मराठा आंदोलकाच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे आदेश पाळावेत आणि पाच हजार सोडून इतरांनी आझाद मैदान आणि मुंबई सोडावी, असे आवाहन मराठा आंदोलकाच्या (Maratha protesters) वकिलांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे हे आठवे उपोषण आहे. सरकारच्या आश्वासनावर आतापर्यंत त्यांनी सातवेळा उपोषण मागे घेतलेले आहे. आताच्या उपोषणाची त्यांनी चार महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती. बेमुदत उपोषणाचे निवेदन असतानाही नियम २६ ऑगस्टला आला. तो लागू करण्यात आला.

पाच हजार क्षमतेच्या आझाद मैदानावर जरांगे यांना उपोषणाची परवानगी देण्यात आली होती. आंदोलक हे काही आरोपी नाहीत. मानवतेच्या दृष्टीने अन्न, पाणी, वीज, शौचालय व इतर पायाभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. आंदोलकांच्या केवळ वाईट गोष्टीच दाखवण्यात आल. चांगल्या गोष्टी पुढे आणलेल्या नाहीत.

आंदोलकांना अन्न, पाणी, वीज, शौचालय आदी मूलभूत सुविधा सरकारने देणे गरजेचे होते. बारा ऑगस्ट रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यासोबत नियोजनाबाबत बैठक झाली होती. त्यांनी सरकारला काय निवेदन केले, हेही पाहिले पाहिजे. त्यानंतर सुविधा न मिळाल्याने ते संतप्त झाले आहेत, असा दावा आंदोलकांच्या वकिलांनी केला आहे.

आंदोलकांचे वकिल म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या असत्या, तर ही वेळच आली नसती. पण, सरकारने जरांगे पाटील यांच्याकडून मुदत घेऊनही मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. आंदोलनात घुसलेल्या काहींच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी पाळण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचेही हक्क हिरावून घेतले नाहीत. जरांगेंचे आंदोलन सरकार, प्रशासनाच्या विरोधात आहे. काही समाजकटंक बेकायदेशीरपणे घुसले आहेत, ते बेकायदा कृत्य करत आहेत. त्याच गोष्टी दाखवल्या जात आहेत. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नियम पाळण्यात येतील.

मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण आहे. दररोज अर्ज करणे शक्य नाही. आंदोलन सकाळी आठ ते पाच असे होऊच शकत नाही. तशी परिस्थिती जरांगे पाटील यांची नाही. मराठा सेवकांनी हा आदेश पाळला पाहिजे. सरकारला मागणी मान्य करायला लावावी. लगेच आंदोलन थांबविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलकांचे वकिल म्हणाले, आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवदेनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आंदोलकांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने ही प्रतिक्रिया घडू शकते. डिस्जार्डट मॅनेजमेंट होणे गरजेचे होते. पण ते झाले नाहीत, त्यामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. आंदोलक आरोपी नाहीत. हुल्लडबाजांना चोख प्रत्युतर द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT