Solapur BJP Politics: चंद्रकांतदादांनी ‘पक्षकर्तव्य’ पार पाडले; तर पालकमंत्री गोरेंनी ‘मैत्रीधर्म’ निभावला!

Chandrakant Patil Jaykumar Gore Solapur Tour: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या घरी; तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ब्रम्हदेवदादा माने बॅंकेतील गणेशोत्सवाला हजेरी लावली.
Chandrakant Patil-Jaykumar Gore Solapur Tour
Chandrakant Patil-Jaykumar Gore Solapur TourSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 September : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोलापूर दौऱ्यात भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या दोन्ही देशमुखांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मैत्रीधर्म’ निभावत माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेवदादा माने बॅंकेतील गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती केली. चंद्रकांत पाटील यांचा दौरा भाजपसाठी विशेष ठरला. त्यामुळे चंद्रकांतदादा आणि गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याची विशेष चर्चा रंगली आहे.

पंढरपुरातील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेही पंढरपुरात होते. त्यानंतर चंद्रकांतदादा हे सोलापूरमध्ये आले होते. त्यांनी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी जाऊन श्री गणेशाची आरती करून ‘श्रीं’चे दर्शन घेतले. या ठिकाणी देशमुख यांच्यासह माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळेही उपस्थित होते.

विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी हजेरी लावली. त्या ठिकाणी गणपतीची आरती करून गौरी-गणपती तसेच विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. खरं तर दोन्ही देशमुख हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भाजपवर विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही देशमुख हे शासकीय बैठकांना हजेरी लावत असताना पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी ठळकपणे दिसून येत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात हे दोन्ही देशमुख अग्रभागी होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. खुद्द चंद्रकांतदादा हे दुसऱ्यांदा दोन्ही देशमुखांच्या घरी जाऊन भेटलेले आहेत.

Chandrakant Patil-Jaykumar Gore Solapur Tour
NCP SP MLA : पवारांच्या आमदाराची एकनाथ शिंदेंसोबत बंद खोलीत तासभर चर्चा; दरेगावातील भेटीबाबत कमालीची गुप्तता!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न यानिमित्ताने होताना दिसत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने तयारीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. पण चर्चेतील अधिकृत तपशील मिळू शकलेला नाही.

मात्र, चंद्रकांतदादांचा नियमित कार्यक्रम होता. त्या नावीन्य काही नाही, असेही सांगण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही देशमुखांच्या घरी भेटी दिली. पण पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाण्याचे टाळल्याचे दिसून येते किंवा त्यांना देशमुखांकडून निमंत्रण नसू शकते.

दुसरीकडे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपले मित्र माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील ब्रह्मदेवदादा माने बॅंकेतील गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची आरती केली. मध्यंतरी बाजार समितीच्या सभापतीपदाबाबत हालचाली होत असल्याची कुणकूण लागली होती.

काही संचालक हे माने यांच्या कामकाजावर नाराज असून ते अविश्वास आणणार असल्याची चर्चा होती. पण गोरे यांना गणेश दर्शनासाठी बोलावून माने यांनीही संबंधितांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Chandrakant Patil-Jaykumar Gore Solapur Tour
Arjun Khotkar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिलेदार अडचणीत; इंदापूर तालुक्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

शहरातील कार्यक्रमात एकत्र; पण...

सोलापूर शहरातील गणेश मंडळांच्या कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि देवेंद्र कोठे यांनी हजेरी लावली. चंद्रकांतदादांनी कोठे यांच्या गणेशाचीही आरती केली. मात्र दोन्ही देशमुखांच्या घरी फक्त चंद्रकांत पाटील हेच गेले होते. पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे हे दोघेही दोन्ही देशमुखांच्या घरी गेले नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com