
Solapur, 31 August : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात बोलताना केली होती. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांतदादांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. त्यानंतर सायंकाळी सोलापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात भांडणे लावू नका, अशी भूमिका घेतली आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मनोज जरांगे पाटील आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेक बैठकांना जरांगे पाटील यायचे, त्यामुळे माझ्या आणि जरांगे पाटील यांच्यात भांडण लावू नका.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे म्हणणं आहे की, कुणबी आणि ओबीसीमधून आरक्षण मिळेल. मी चार वेळा ते म्हणतो. पण ते म्हणण्याने मिळणार आहे का? त्यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर सर्व प्रयत्न सुरू आहेत, ओबीसीतून मिळेल किंवा कुणबीतून मिळेल, त्यासंदर्भातील जर तरचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तज्ज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीत तज्ज्ञमंडळी सकारात्मक आहोत, असेही चंद्रकांतदादांनी सांगितले.
मंत्री पाटील म्हणाले, पहिलं तीन ते चार दाखले दिले, की कुणबी दाखला मिळायचा. मात्र आता 23 कागदपत्रे समितीने सांगितली आहेत, आतापर्यंत नोंदी 58 लाखापर्यंत गेल्या आहेत. दहा लाखांपर्यंत दाखले मिळाले आहेत. मुख्यमंत्री आत्ताचे आणि आधीचेही त्यांना खोटं बोलणं अजिबात जमत नाही, राजकीय परिणीमाची ते चिंता करत नाहीत, जे खरं आहे, तेच खरं म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यातून काय मार्ग काढता येईल, ते पाहत आहे.
मराठा समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे, भांडण लावून काही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर पाच हजार लोकांना परवानगी दिली होती. आझाद मैदानापेक्षा बाहेर लोकांची जास्त गर्दी दिसत आहे. पहिल्या दिवशी नियोजनाचा गोंधळ झाला. आता महापालिकेने उत्तम व्यवस्था केली आहे, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले, उपसमितीची राज्याचे जनरल ॲडवोकेट यांच्यासोबत बैठक झाली. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध जणांसोबत बोलत आहेत. आज दिवसभर प्रस्ताव काढले असून त्याच्यावर विचारविनिमय झाला आहे. त्यातून आम्ही मुद्दे मांडले आहेत, हे पर्याय असू शकतात. यामध्ये भावना आणि कायदा हा वेगळा विषय आहे.
जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, जरांगे पाटील अनेक वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी काम करत आहेत, त्यातून त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं लक्ष नाही, त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटील यांची एक भाषा आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रागवत नाही. जरांगे पाटलांना एक विनंती आहे, त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी ते बोलावं.. पण जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसवर बोलतात.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. फडणवीस यांच्या पारदर्शकतेवर आणि हेतूवर चॅलेंज करणे, हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. मुख्यमंत्री असल्याने त्यांनी ते सहन केलं पाहिजे. तरी त्यांची आई आणि बायकोवर बोलतात. जरांगे पाटील यांची ग्रामीण भाषा आहे. त्यावर जरांगे पाटील काही बोलू नये. त्यांना मैत्रीच्या नात्यातून आमची विनंती आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.