Mumbai police FIR child abuse Sarkarnama
मुंबई

Mumbai police FIR child abuse : थरकाप उडवणारी घटना; बापानं पेटत्या सिगारेटचे चिमुकलीला दिले चटके

Father Booked for Burning Daughter with Cigarette in Mankhurd Mumbai : मानखुर्द पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून लगोलग करबला मैदानाजवळील वस्ती गाठली. तोवर आरोपी तेथून पसार झाला होता.

Pradeep Pendhare

Mumbai crime against children : झोपत नाही म्हणून पाच वर्षांच्या चिमुकलीला पित्याने बेदम मारहाण केलीच; पण चेहऱ्यावर पेटत्या सिगारेटचे चटकेही दिले. मारहाण अशीच सुरू राहिली, तर चिमुकलीचा जीव जाईल, हे जाणून शेजारील युवतीने हा प्रकार व्हिडिओ तयार करून तो एका प्राणिमित्रामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचवला. ही घटना सोमवारी मानखुर्द इथं घडली.

शेजारील युवतीने आणि प्राणिमित्राच्या प्रसंगावधानाने या चिमुकलीचा जीव बचावला. मानखुर्द पोलिसांनीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्वरित हालचाल करून आरोपी पित्यास ताब्यात घेतले.

मुंबईतील (Mumbai) मानखुर्दच्या करबला मैदानाजवळील वस्तीत आरोपी राजेशराम ऊर्फ भगवान हा पत्नी, दोन मुलांसह राहतो. आरोपी बेरोजगार असून, तो अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. पत्नी चार घरची धुणीभांडी करून, आजारी व्यक्तींची सेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते.

राजेशाम याने धाकट्या मुलीला पाय बांधून बेदम मारहाण (Crime) केली. मारहाणीमुळे मुलगी मोठ्याने रडत होते. बहिणीला होत असलेली मारहाण पाहून तिचा मोठा भाऊही रडू लागला. ही लहान मुले किंवा त्यांच्या आईला आरोपी राजेशामकडून होणारी मारहाण या वस्तीला नवी नव्हती; मात्र राजेशाम याने चिमुकल्या मुलीचा गळा आवळलेला पाहून शेजारील मुलीने झटपट आपल्या मोबाईलमध्येत्या प्रसंगाचा व्हिडिओ काढला आणि तो अब्दुल शेख या प्राणिमित्रापर्यंत पोहोचविला.

लहान मुलांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या अब्दुलने तो व्हिडिओ पाहून प्रथम चाइल्ड लाइनवर संपर्क साधला आणि तडक मानखुर्द पोलिस ठाणे गाठले. मानखुर्द पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून लगोलग करबला मैदानाजवळील वस्ती गाठली. तोवर आरोपी तेथून पसार झाला होता; मात्र दोन लहान मुले घरी होती.

दोन्ही मुलांना पोलिस ठाण्यात आणल्यावर मुलीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आढळले आणि चेहऱ्यावर पेटत्या सिगारेटने दिलेले चटके आढळले. पोलिस पथकाने आसपास शोध सुरू केला. इतक्यात परिसरातल्या नागरिकांनीच आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी बालिकेवर उपचार करून घेतले आणि त्यांची आई घरी परतल्यावर मुलांना तिच्या हवाली केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT