BJP-Shivsena-Congress
BJP-Shivsena-Congress Sarkarnama
मुंबई

सभापतिपदाची निवडणूक : शिवसेना-काँग्रेस उमेदवाराचा विजय भाजपच्या हाती!

सरकारनामा ब्यूरो

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक येत्या ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पदासाठी काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने अरूण राऊत, तर शिवसेनेच्या (shivsena) वतीने नगरसेवक संजय म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे (bjp) ४ सदस्य कोणाला मतदान करणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. सभापतिपदासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होत असल्याची चर्चा रंगली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी भाजप नगरसेवकांची मनधरणी केली जात आहे. (Fight between Shiv Sena and Congress for Chairman of Bhiwandi Corporation Standing Committee)

भिवंडी महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिवसेना उमेदवार संजय म्हात्रे यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे म्हात्रे हे सभापतीपदी बिनविरोध निवडून आले होते. आता त्यांचा सभापतीपदाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने रिक्त पदासाठी येत्या ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक होत आहे.

शासकीय आदेशानुसार महापालिकेच्या सभागृहात ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी हात वर करून ही निवडणूक होणार असल्याची माहिती नगर सचिव अनिल प्रधान यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (ता. ६ फेब्रुवारी) दिवशी दुपारी काँग्रेसतर्फे नगरसेवक अरुण राऊत यांनी, एक तर शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक संजय म्हात्रे यांनी आपले ३ उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल प्रधान यांच्याकडे सादर केले आहेत.

भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती मध्ये नगरसेवकांचे संख्याबळ १६ असून त्यामध्ये काँग्रेस पक्ष ८, शिवसेना २, कोणार्क विकास आघाडी २ आणि भाजपची ४ सदस्य संख्या आहे. शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना काँग्रेस पक्षाचा काही नगरसेवक तसेच अन्य नगरसेवकांचा पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजप पक्षाचे नगरसेवक कोणाला पाठिंबा देणार, हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT