शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे धडा शिकवणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी

मनसे ठाणे विकास आघाडीद्वारे निवडणूक लढवणार; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
MNS-NCP-Shivsena
MNS-NCP-ShivsenaSarkarnama

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजताच सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी पलिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला तरी ठाण्यात वेगळेच चित्र आहे. पलिका निवडणुकीमध्ये अस्तित्व टिकून राहावे, यासाठी मनसेने छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजसेवी प्रभूतींसोबत मोट बांधून ‘ठाणे विकास आघाडी’ स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मनसेच्या या नव्या आघाडीला प्रतिसाद मिळतो का, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. (MNS will contest municipal elections with local lead in thane)

MNS-NCP-Shivsena
सोमय्यांवरील हल्ल्याबाबत उदयनराजे म्हणाले, ही तर झुंडशाहीची नांदी...

ठाणे पालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेली अनेक वर्षे ठाणेकरांना गृहीत धरून सत्ताकारण करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष) धडा शिकवण्याचा चंग मनसेने बांधला आहे. त्यासाठी छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजसेवी प्रभूतींची मोट बांधून ‘ठाणे विकास आघाडी’ रिंगणात उतरवणार असल्याचे सूतोवाच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे. तसेच, ज्यांना तिकीट मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेऊन ही आघाडी स्थापन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

MNS-NCP-Shivsena
मित्रासोबतचे फोटो बॅनरवर लावून बदनामी करण्याची शिवसेना नेत्याची महिलेला धमकी

याबाबत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की, आगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे विकास आघाडी स्थापन करण्याची चाचपणी ठाण्यात करत आहोत. या आघाडीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवानगी दिली, तर या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com