Rohit Pawar FIR Mumbai Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar FIR Mumbai : रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल; पोलिसांशी गैरवर्तनाचा ठपका

FIR Against NCP MLA Rohit Pawar at Azad Maidan Mumbai : आमदार रोहित पवार यांची मुंबई आझाद मैदान पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांबरोबर वाद झाले होते.

Pradeep Pendhare

FIR against Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळताना व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे समोर आणला.

मंत्री कोकाटे यांच्या या कृतीवरून राज्यात भाजप महायुतीविरोधात सकाळपासून विरोधक आक्रमक झाले असतानाच, आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईतील आझाद पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. मंत्री कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आणल्यानंतरच आमदार पवारांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याने, यामागे वेगळाच वास असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.

आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईतील (Mumbai) आझाद मैदान पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकमध्ये विधिमंडळ परिसरात मारामारी झाली होती. यात जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना अटक करण्यात आली होती. या कारवाई विरोधात रोहित पवार यांचा आझाद मैदाना पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाले होते. तसा व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहे.

तणावाचे वातावरण

हाणामारीत सहभागी कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधिमंडळातून ताब्यात घेत मध्यरात्री मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या मागोमाग आमदार आव्हाड, रोहित पवार आणि कार्यकर्त्यांचा ताफा पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाला. या तणावपूर्ण वातावरणात गुन्हा नोंदवण्याची, अटकेची प्रक्रिया पूर्ण करणे पोलिसांना कठीण झाले होते.

आमदार पवार 'आझाद'ला पोचले

पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे आरोपींची सुरक्षा आणि दोन गटांत हाणामारीची शक्यता होती. त्याच वेळी देशमुख यांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्याची वावडी उठली. त्यानुसार रोहित पवार कार्यकर्त्यांसह आझाद मैदान पोलिस ठाण्यात पोचले. नितीन देशमुख कुठे आहेत, असा सवाल करतच पवार पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या या प्रश्नाने उपस्थित पोलिस अधिकारी, अंमलदार भांबावले. देशमुख इथं नाहीत. हे प्रकरण मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचे आहे, असे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले.

आमदार पवार चांगलेच संतापले

मात्र पोलिस खोटी माहिती देत आहेत, असा समज करून पवार संतापले. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याचाही आवाज वाढला. तेव्हा आवाज खाली, शहाणपणा करायचा नाही. हात वर केला, तर सांगतो तुम्हाला, असे सांगत पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दम दिला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत पोलिस ठाणे डोक्यावर घेतले.

वरिष्ठांचा हस्तक्षेप

या प्रकाराची माहिती मिळताच अधिकची कुमक घेऊन तिथं दाखल झालेले कफ परेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी मध्यस्थी करीत परिस्थिती हाताळली. त्यांनी पवार आणि कार्यकर्त्यांची समजूत घातली, तेव्हा वातावरण निवळले आणि कार्यकर्त्यांसह पवार तिथून निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT