FIR Filed Ganesh Patil sarkarnama
मुंबई

FIR Filed Ganesh Patil : भाजपच्या नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण, कार्यालयात डांबले; गुन्हा दाखल

Ganesh Patil BJP BVA : रवी झा हे आपल्या घरी असताना, मुनीम ऊर्फ मुन्ना गुप्ता याने त्यांना गाठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवकाच्या कार्यालयात डांबून झा यांना मारहाण करण्यात आली.

संदिप पंडित

Vasai News : भाजपच्या नगरसेवकाने आपल्याच कार्यालयात तरुणाला डांबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना वसईमधील वालीव परिसरात उघडकीस आली आहे. मारहाण करणाऱ्या नगरसेवक गणेश पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहितीनुसार, रवी भरत झा यांनी गेल्या निवडणुकीत 'शिटी' या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या बविआच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. हाच राग मनात धरून भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

26 फेब्रुवारी रोजी रवी झा हे आपल्या घरी असताना, मुनीम ऊर्फ मुन्ना गुप्ता याने त्यांना गाठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर बळजबरीने त्यांना नगरसेवक गणेश पाटील यांच्या कार्यालयात नेले. तेथे डांबून ठेवत नगरसवेक पाटील झा यांना झा यांना त्यांच्या राजकीय भूमिकेवरून जाब विचारण्यास सुरुवात केली. "तू आमच्या विरोधात प्रचार करून स्वतःला मोठा समजतोस का?" अशा शब्दांत दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

आपल्यावर चुकीचे आरोप

गणेश पाटील यांनी त्यांच्यावर होत असलेला आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, रवी झा जेथे राहतो तेथे नवीन एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या साफसफाई करतना कचरा आणि पाणी रस्त्यावर आले. त्यावरून मुन्न गुप्ता याने तिकडे जाऊन विचारना केली, मात्र, रवी झा याचा काहीही संबध नसताना त्याने गुप्ता यांच्याशी वाद घातला. त्यामुळे रवी झा याला ऑफीसला बोलवून मी फक्त समज दिली. माझ्याव मारहाणचा होत असलेला आरोप खोटा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT