Rahul narawekar, jayant patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : जयंत पाटलांसाठी पवार एकच, ते म्हणजे शरद पवार...!

Political News : अजित पवारांचं नाव घेणं निषिद्ध आहे !

Jui Jadhav

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र सुनावणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उलटतपासणी सध्या सुरू आहे. यावेळी उत्तर देताना पवार या शब्दावरून शरद पवारांच्या वकिलाने हरकत घेतली. पवार यांचा उल्लेख शरद पवार असा करावा, इतर कोणी नाही, अशी हरकत घेताना ते आढळले.

जयंत पाटील यांची उलटतपासणी सुरू आहे. त्यावेळी आपला जबाब नोंदवताना जयंत पाटील हे वारंवार पवार या शब्दाचा उल्लेख करीत होते. त्यांची उत्तरे लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांनीदेखील पवार असाच उल्लेख केला. मात्र, यावर शरद पवारांच्या गटातील वकिलांनी आक्षेप घेतला. पवार म्हणजे तिथे शरद पवार असा उल्लेख करावा, अन्यथा पवार म्हणजे नंतर अजित पवार असे कोणी समजायला नको. त्यांच्यासाठी पवार म्हणजे एकच आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या वक्तव्याने सभागृहात सगळ्यांना हसू अनावर झाले. जयंत पाटील यांच्यासाठी पवार म्हणजे एकच आणि ते म्हणजे शरद पवार आहेत. त्यांचे सर्वेसर्वा. असा मिश्किल टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लगावला. त्याचवेळी, अजित पवारांच्या गटाकडूनदेखील त्यात भर टाकण्यात आली. पवार म्हणजे शरद पवार बरोबर आहे, दुसऱ्या पवारांचे नाव घेणं अयोग्य आहे, निषिद्ध आहे, असे वक्तव्य अजित पवारांच्या वकिलांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील यांची 'तीच-ती' उत्तरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांची उलटतपासणी सुरू आहे. ही उलटतपासणी सुरू असताना अजित पवार गटातील वकिलांनी जयंत पाटलांविरोधात नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील हे प्रत्येक प्रश्नाचे तेच-तेच उत्तर देत आहेत. मोठ्या मोठ्या शब्दात ते उत्तरं देत आहेत. केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्यांनी याचं भान ठेवले पाहिजे आणि जेवढी उत्तरं अपेक्षित आहेत. तितकीच उत्तरं द्यावी, अशी मागणी अजित पवार यांच्या वकिलांनी केली आहे.

तुम्ही वकिलांना अपेक्षित उत्तरे देत नाही आहात

जयंत पाटील यांच्या उत्तरांवर प्रश्न उपस्थित केले गेले. जयंत पाटील हे जाणूनबुजून चुकीची उत्तरे देत असून मोठी उत्तरे देत असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. एखादा प्रश्न न समजल्यावर ते मला हा प्रश्न समजला नाही, असे थेट सांगायचे, मात्र त्यावर विधानसभा अध्यक्ष यांनीदेखील त्यांना मिश्किल टोला लगावला. वकिलांना जे उत्तर अपेक्षित नाही ती उत्तरे तुम्ही त्यांना देत आहात, म्हणून त्यांचे वकील तुम्हाला वारंवार तेच तेच प्रश्न फिरून विचारत आहेत. त्यांना अपेक्षित उत्तरे द्या, असा टोला अध्यक्षांनी लगावला.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT