Vikas Gajanan Mhatre and Kavita Mhatre Join Eknath Shinde’s Shiv Sena | BJP Leaders Switch Sides sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचा भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; माजी तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

BJP Vs Shivsena Kalyan-Dombivli : एकनाथ शिंदेंनी भाजपला धक्का देत त्यांनी तीन माजी नगरसेवकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश दिला आहे.

शर्मिला वाळुंज

Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंना धक्का देत कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना भाजपमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशाला 24 तास होत नाहीच तो एकनाथ शिंदेंनी भाजपला धक्का दिला. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो तेथील भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला.यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे विरुद्ध भाजप लढत

कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. तर, एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याच्या प्रयत्न दोन्ही पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक ही एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत इन्कमिंग

यावेळी भिवंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगावचे विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT