Mumbai News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कोकण दौरा संपवून खेडवरून मुंबईकडे येत असताना 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. ठाकरेंनी 'वंदे भारत एक्सप्रेस'ने प्रवास केलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर आता भाजपने ट्विट करत ठाकरेंना डिवचलं आहे. (Uddhav Thackeray Vande Bharat Express )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'वंदे भारत एक्सप्रेस' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भारतात अनेक ठिकाणी 'वंदे भारत एक्सप्रेस' सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच भाजपकडून 'वंदे भारत एक्सप्रेस' या प्रोजेक्टचे मोठ्या प्रमाणात मार्केटींग देखील करण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यातच उद्धव ठाकरेंनी सोमवारी कोकण दौरा संपल्यानंतर मुंबईकडे जात असताना 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास केला. यावरूनच आता भाजपने ट्विट करत "मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, 'वंदे भारत एक्सप्रेस'चा आरामदायी प्रवास, तिसरी बार...मोदी सरकार"!, असं भाजपने म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या योजनेचे उद्धव ठाकरे हे देखील लाभार्थी आहेत, अशी खोचक टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
तसेच "कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा 'वंदे भारत ट्रेन' मधून प्रवास करून लाभार्थी होतात, तेव्हा समाधान वाटतं. लवकरच 'बुलेट ट्रेन'ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की", असं ट्विटद्वारे ठाकरेंना डिवचलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कुडाळ, मालवण आणि कणकवली अशा ठिकठिकाणी सभा, मेळावे घेत जोरदार मोर्चेबांधणी केली. तसेच या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर मात्र, पंतप्रधान मोदींच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'चे उद्धव ठाकरेही लाभार्थी आहेत, अशी खोचक टीका करत भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.