Nitesh Rane : मालेगाव 'मिनी पाकिस्तान' विधानावर नितेश राणे ठाम; म्हणाले, "माफी मागणार..."

Nitesh Rane On Malegaon : "आम्ही मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे," असंही नितेश राणेंनी म्हटलं.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

वीज चोरीचा थेट अतिरेकी कारवायांशी संबंध जोडून नाशिकमधील मालेगावला भाजप आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी 'मिनी पाकिस्तान' म्हणून संबोधलं होतं. या वक्तव्यानंतर नितेश राणेंवर टीकेची झोड उठली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख रशीद यांनी वकीलामार्फत नोटीस पाठवून नितेश राणेंनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. पण, आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Nitesh Rane
Ganpat Gaikwad Firing : महेश गायकवाडांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रूग्णालयानं दिली 'ही' माहिती

"मी मालेगावचा ( Malegaon ) उल्लेख पाकिस्तान केल्यानं अनेकांना मिरच्या झोंबल्या. मालेगावमध्ये राहून पाकिस्तानचे नारे देण्यात येतात. त्यामुळे मालेगावला आम्ही पाकिस्तान बोलत होतो, आजही बोलतो आणि पुढेही बोलत राहू," असं नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane
Nagar News : विवेक कोल्हेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना झापलं; नेमकं काय घडलं?

"मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय"

"मालेगावला 'मिनी पाकिस्तान' म्हणण्याची वेळ का आली? याचा पुरावा मी दिला आहे. माजी आमदार असिफ शेख हे पाकिस्तानचे एजंट आहेत. आम्ही मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काही चुकीचं बोललो नसल्यानं माफी मागणार नाही. कायदेशीर उत्तर देईन," असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंचं विधान काय?

आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत मिनी पाकिस्तानमध्ये ( मालेगाव ) 319 कोटी रूपयांची वीज चोरी झाल्याचा आरोप केला. हा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जातो, असा आरोपही राणेंनी केला होता.

Nitesh Rane
Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

माजी आमदार शेख काय म्हणाले?

'मिनी पाकिस्तान' उल्लेख केल्यानं माजी आमदार असिफ शेख रशी यांनी वकीलामार्फत नितेश राणेंना नोटीस पाठवली आहे. "याप्रकरणी माफी मागा, अन्यथा तुमच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू. मालेगाव फक्त मुस्लिमांचे नाही. येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. वीज चोरीचा प्रकार संपूर्ण मालेगावमध्ये झाला. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, याचे कनेक्शन जोडून मालेगावला थेट मिनी पाकिस्तान कसे संबोधले गेले?" असा सवालही असिफ शेख यांनी उपस्थित केला.

Nitesh Rane
Satara NCP News : जयंत पाटील म्हणाले, पर्याय नाही ; तर परतफेडीचा शशिकांत शिंदेंनी कोणाला दिला इशारा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com