Smita Angre Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thackeray In Thane : रोशनी शिंदेंची हालत बघितली ना? आता तुझा नंबर...: शिंदे गटाकडून युवती सेनेच्या पदाधिकारीला धमकी

माझे कुटुंबीय प्रचंड तणवाखाली आहे. माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : शिंदे गटातील (Eknath shinde) महिलांकडून ठाण्यातील ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) रोशनी शिंदे यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच युवती सेनेच्या (yuvti Sena) आणखी एका पदाधिकाऱ्याला धमकी (threat) देण्यात आली आहे. रोशनी शिंदेंची हालत बघितलीस ना. तिच्यासारखीच तुझीही हालत करेन, अशी धमकी शिंदे गटातील माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी युवती सेनेच्या स्मिता आंग्रे हिला दिली आहे. (Former corporator of Shinde group threatened Smita Angre, an office bearer of yuvti's Sena)

युवती सेनेच्या स्मिता आंग्रे हिने शिंदे गटातील अमित परब यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर ‘विकास नम्रमपणे दरवळतोय’ अशी कमेंट केली होती. त्यानंतर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शिंदे गटातील माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी स्मिता आंग्रे हिला व्हॉटस अप कॉल करून धमकी दिली. रोशनी शिंदेंची हालत बघितली ना? आता तुझा नंबर आहे. तिच्या सारखीच हालत तुझी पण करेन, अशी धमकी देत शिवीगाळ केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाची युवती सेनेची (ठाकरे गट) स्मिता आंग्रे ही अधिकारी आहे. दरम्यान, रोशनी शिंदे हिचे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा युवती सेनेच्या पदाधिकाऱ्याला पुन्हा धमकी आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेने दिलेल्या धमकीची तक्रार नोंदविण्यासाठी स्मिता आंग्रे ही स्थानिक श्रीनगर पोलिस ठाण्यात गेली. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मिताने थेट पोलिस आयुक्तालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे. त्यात तिने माझे कुटुंबीय प्रचंड तणवाखाली आहे. माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. या प्रकरणात आपण हस्तक्षेप करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती स्मिता हिने पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT