Suvarna Karanje News  Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde: मुंबईत राजकारण तापलं; सुवर्णा कारंजेंच्या नावावर ठाकरे गटाचा हातोडा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत गुरवारी (दि.15 जून) प्रवेश केला. सुवर्णा कारंजे यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मात्र, आता त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

सुवर्णा कारंजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर सुवर्णा करंजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा रोष व्यक्त केला आहे.

कांजूरमार्ग येथील ठाकरे गटाच्या शाखेच्या कार्यालयातील माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांचे नाव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे कांजूरमार्गमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, मनसे यासह सर्वच रजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. असे असतानाच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग येथील माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT