Mumbai civic polls 2025 Sarkarnama
मुंबई

Mumbai civic election : किशोरी पेडणेकरांसह दोन्ही शिवसेनेच्या 15 माजी नगरसेवकांचे प्रभाग डेंजर झोनमध्ये : राज्य सरकारडून BMC साठी राखीव जागांची अधिसूचना जारी

Mumbai municipal corporation polls News : मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असून, सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता राज्य सरकारने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आता याठिकाणचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या नव्या आरक्षणामुळे शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जवळपास 15 माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना याचा फटका बसणार आहे.

निवडणूक आयोगाकडून दिवाळीनंतर मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असून, सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना मंजूर झाली असल्याने आता महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना काढल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या नव्या आरक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही गटांतील 15 माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होण्याची शक्यता आहे.

या आरक्षण होत असलेल्या प्रभागात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभागाचाही समावेश आहे. तर भाजपच्या केवळ दोन माजी नगरसेवकांना याचा थेट फटका बसणार आहे. त्यामुळे भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणानंतर प्रभाग रचनेत झालेले बदल अनेक विद्यमान नगरसेवकांसाठी धक्कादायक ठरणार आहेत. तर दुसरीकडे अनेक नवीन चेहऱ्यांना या मुळे संधी मिळणार आहे. आरक्षणाची घोषणा झाल्यानंतरच याबाबत अधिक बोलता येणार आहे. तर दुसरीकडे अनेक इच्छुक नगरसेवकांनी आरक्षणाची घोषणा होण्यापूर्वीच प्रभागात तयारी सुरु केली आहे.

येत्या काळात आरक्षणाची सोडत काढल्यानंतर आता राजकीय हालचालीना वेग येणार आहे. आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून प्रभागनिहाय रणनीती आखण्यासाठी सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT