Arun Gujrathi - Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Arun Gujrathi : 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातील एक-एक ओळ...; अरुण गुजराथींनी सांगितला अनुभव

Sharad Pawar - Lok Maze Sangati: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'-भाग दोन या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'-भाग दोन या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. या आवृत्तीमध्ये त्यांनी त्यांच्या अनेक प्रवासाबद्दल लिहिलं आहे.

आज 'लोक माझे सांगाती' भाग दोन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे. यावेळी 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक कसं आहे, याबाबत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी सांगितलं आहे.

अरुण गुजराथी म्हणाले, "शरद पवार हेच एक पुस्तक आहे. त्यांच जीवन हेच एक सिद्धांत आहे. त्यांचे जीवनच अशा प्रकारचे आहे. तीन वर्षापूर्वी काय घटना घडली हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे यामधून त्यांच राजकीय चातुर्य कळतं. कधी घडलं नाही ते घडलं. घडवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व पवार साहेबांचे आहे", असं ते म्हणाले.

"'लोक माझे सांगाती' हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे. कारण अनेक पुस्तकामधील एक पुस्तक, एका पुस्तकामधील एक प्रकरण, एका प्रकरणातील एक पान आणि एका पानातील एक परिच्छेद आणि एका परिच्छेदामधील एक ओळ आणि एका ओळीतील एक शब्द, हा आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल, अशा पद्धतीचे हे पुस्तक आहे", असा अनुभव अरुण गुजराथी यांनी सांगितला.

तसेस यावेळी माजी आमदार हेमंत टकले हे देखील बोलले. ते म्हणाले की, "आज कुठल्याही क्षेत्रातील कुणालाही आशीर्वाद हवे असतील तर हक्काने जाण्याचं ठिकाण म्हणजे शरद पवार आहेत. हे महाराष्ट्राने अनेकवेळा सिद्ध केलं आहे. कालचा एक प्रसंग आहे. कोकणात रिफायनरीवरून एक आंदोलन सुरू आहे. ती सगळी मंडळी काल शरद पवारांना भेटायला आली होती".

"यामध्ये चर्चेतून प्रश्न सुटू शकतात, असा शब्द उदय सामंत यांनी त्यांना दिला. आता उदय सामंत भेटायला आले तर याचे राजकीय अर्थ काढले जातात. पण येथे समाजकारण, अर्थकारण आणि लोककारण हे आहे. 2019 च्या निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात पावसातील सभेने महाराष्ट्रातील सर्व चित्रच बदलून गेलं. महाराष्ट्रामध्ये सगळा अध्याय बदलून गेला", असं त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT