APMC Result : महाविकास आघाडीचा डंका तर शिंदे-भाजप आघाडी जमिनीवर!

बाजार समित्यांच्या १३ पैकी ८ महाविकास आघाडीकडे, भाजपचा स्वबावर भोपळा
Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik APMC analysis : जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात महाविकास आघाडीने ८ व दोन आघाडी जिंकल्या. यात सर्वात मोठा दणका शिवसेनेत फूट पाडून निर्माण झालेल्या शिंदे गटाला बसला. त्यांचे पुरते पाणीपत झाले. भाजपला स्वबळावर एकाही ठिकाणी जिंकता आले नाही. त्यामुळे एकंदरच भाजप, शिंदे गट नकोरे बाप्पा असा जाणत्या मतदारांचा संदेश आहे, असे म्हटल्यास वावगे नाही. (Selective & knowing voters dislike Eknath Shinde-BJp allince)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील तेरा बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC election) पार पडल्या. त्यात एकंदरच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपले राजकीय नाणे वाजवून घेतले. बहुचर्चीत शिंदे गटाला (Eknath Shinde) मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. भाजपला (BJP) स्वबळावर एकही समिती मिळवता आली नाही. एकंदर विधानसभेच्या या चाचणीत आघाडीचे तिन्ही पक्ष शहाण्यासारखे वागले तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा हा संदेश आहे.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Manmad APMC result : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे पानिपत!

बाजार समित्यांच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक मतदान करतात. हे मतदार म्हणजे गावगाडा हाकण्यात तरबेज अन् राजकारणातील पुरते `बनेल` मतदार असतात. त्यांना चांगले, वाईट, राजकारणाची हवा आणि भवितव्य या सगळ्यांची जाण असते. एखादा सर्व्हे करताना निवडक लोकांची मते घेतली जातात. तसे बाजार समित्यांच्या निकालाचे विश्लेषण केल्यास आगामी विधानसभा निवडणुकांचे संभाव्य चित्र काय असेल याचा नेमका अंदाज यातून बांधता येऊ शकतो.

जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांचा निकाल असा, नाशिक (राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे), येवला (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ), मालेगाव (शिवसेना (ठाकरे गट) उपनेते अद्वय हिरे), कळवण ( काँग्रेसचे आमदार नितीन पवार), पिंपळगाव बसवंत (राष्ट्रवादी काँग्रेसचे आणदार दिलीप बनकर), दिंडोरी (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपत बाबा पाटील), मनमाड (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ), चांदवड (काँग्रेसचे नेते माजी आमदार शिरीष कोतवाल), लासलगाव (राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ थोरे आणि भाजपच्या डी. के. जगताप), देवळा (भाजपचे केदा आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आबा आहेर), नांदगाव (शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे), सुरगाणा (माकपचे नेते जे. पी. गावित), सिन्नर (राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव काकोट व शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे समसमान). हे चित्र अत्यंत बोलके आहे. ग्रामीण व सहकार क्षेत्रात भाजप आणि शिंदे गटाचे अस्तित्व नगण्य आहे.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Sinnar APMC News : `या`मुळे निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना धक्का?

या बाजार समित्यांचा निकाल पाहता जे जिंकले त्यात महाविकास आघाडी सर्वात पुढे आहे. मात्र त्या त्या ठिकाणी ज्यांचा पराभव झाला त्यात देखील भाजप किंवा एकनाथ शिंदे गट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली, तीथे पराभव झाला त्यात देखील त्यांचेच स्थानिक विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच आहे. येवला, पिंपळगाव बसवंत, सिन्नर या बाजार समित्यांत विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली असली, तरी जिंकणारा राष्ट्रवादी असेल तर पराभूत होणारा शिवसेना (ठाकरे गट) होता. मालेगाव व नांदगाव मतदारसंघातही तसेच चित्र होते. मात्र पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केला. तीथे शिंदे गटाने राष्ट्रवादी व काँग्रेसची सोय केली आहे.

या निकालातून दोन संदेश मिळतात, पहिला शिवसेना उद्धव ठाकरे गटात शिंदे गटाने कितीही फोडाफोडी केली, तरी दोन्ही काँग्रेस ती उणीव भरून काढणार आहे. त्यामुळे अंतिमतः शिंदे गटाच्या हाती फारसे काही लागणार नाही. येवल्यात श्री. भुजबळ यांनी शिवसेनेचा मोठा गट आपल्या बरोबर घेतानाच आमदार नरेंद्र दराडे यांना आपला भावी विरोधक म्हणून प्रोजेक्ट केले. त्यातही भुजबळांचीच सोय आहे. भाजप इथे कुठेच नसल्याने येवला, निफाड, सिन्नर मतदारसंघात त्यांना कार्यक्षम उमेदवार आयात करण्याची सोय झाली आहे. मालेगाव मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांच्या सेनेचा आवाज मोठा आणि प्रभाव कमी अशी स्थिती असल्याचे उघड झाले. त्यामुळे दादा भुसे विरूद्ध अद्वय हिरे असे विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये परस्पर समन्वय, राजकीय शहाणपणाने वागले तर महाविकास आघाडीला अडचण नाही, असा संदेश बाजार समित्यांच्या निकालाचा आहे.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Nandgaon APMC News : छगन भुजबळ यांनी सुहास कांदेची पुरती दमछाक केली

दडपशाही निरूपयोगी

या निवडणुकीत मर्यादीत व ग्रामपंचायतीचे कारभारी मतदार असतात. त्यांना रोजच आमदारांशी काम पडते. विकासकामे हवी तर आमदाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शक्यतो ग्रामपंचायत गटाचा कल आमदारांच्या बाजुने असतो. त्यातून मालेगाव, नांदगावमध्ये सत्ताधारी आमदारांनी मतदारांवर खुप दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मतदार त्याला बधले नाहीत. नाशिक बाजार समितीत प्रतिस्पर्धी पराभूत शिवाजी चुंभळे यांच्यावर असाच आरोप आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत दोन तक्रारी दाखल आहेत. मात्र हिरामण खोसकर, सरोज अहिरे हे दोन आमदार पिंगळे यांच्या बरोबर असल्याने ग्रामपंचायत गटात त्यांना एकतर्फी फायदा झालेला दिसला.

Devidas Pingle, Nitin Pawar, Dilip Bankar & Chhagan Bhujbal
Dindori APMC : झिरवळांच्या मतदारसंघात झाला युवा नेतृत्वाचा उदय!

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचा झंझावात राहिला आहे. भाजप आणि शिंदे गटाने बाजार समित्यांमध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जादू चालली नाही. मालेगावमध्ये शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. तेथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलने पालकमंत्री भुसे यांची सत्ता उलथून लावली आहे. येवल्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सरशी झाली असली, तरी लासलगावमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंढरीनाथ थोरे भुजबळ यांना भारी पडले आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी आपला गड कायम राखला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार अनिल कदम यांना तेथे पराभव पत्करावा लागला. अनिल कदम व भाजपचे युवानेते यतीन कदम हे चुलत बंधू परस्परांमध्ये भिडल्याने जोरदार राडा झाला. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलने परिवर्तन घडविले असून, भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी आपला गड कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com