Manohar Joshi Sarkarnama
मुंबई

Manohar Joshi Passed Away:माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi Passed Away : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खास विश्वास असलेले जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी यांचे शुक्रवारी 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. (Manohar Joshi Death News)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खास विश्वास असलेले जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रूपारेल कॉलेजजवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या जोशी यांनी लोकसभा अध्यक्षपदाची धुरासुद्धा अतिशय कुशलतेने सांभाळली होती. जोशी यांच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती.

महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द

मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे.

  • मनोहर जोशी हे मूळचे बीड येथील होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला.

  • शिक्षणासाठी ते मुंबईत स्थलांतरित झाले.

  • मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली.

  • बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं.

  • 1995 मध्ये युतीची सत्ता आली, त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

  • गेल्या काही वर्षापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT