Vishal Patil Politician: खासदारांच्या 'होम ग्राउंडवर' विशाल पाटलांच्या 'होम मिनिस्टर'

Sangli Lok Sabha Elections 2024: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीचे सेटलमेंटचे राजकारणही वेळोवेळी दिसून आले आहे.
Sangli Lok Sabha Elections 2024 News
Sangli Lok Sabha Elections 2024 NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील मैदानात उतरल्या असून, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील गावोगावी 'मी सक्षमा' कार्यक्रमातून निवडणुकीच्या साखरपेरणीला सुरुवात केली आहे.

खासदारांच्या 'होम ग्राउंड'वर विशाल पाटलांच्या (Vishal Patil Politician )'होम मिनिस्टर'नी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा सहभागही लक्षवेधी ठरत आहे. खासदारांच्या बालेकिल्ल्यातच विशाल पाटलांनी आव्हान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेला तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ खा. पाटील यांचा बालेकिल्ला राहिला आहे. किंबहुना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीचे सेटलमेंटचे राजकारणही वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी खासदारांना उच्चांकी मताधिक्य मिळाले होते.

गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांत झाली. त्यामुळे पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाली आहे. खासदारांच्या बालेकिल्ल्यातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

गावोगावी महिला मेळावे घेण्याबरोबरच जिल्हा परिषद गटनिहाय स्वतः विशाल पाटीलदेखील मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी 'मी सक्षमा' कार्यक्रमांतर्गत महिलांचे मेळावे घेतले जात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग बोलका ठरत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारांच्या बालेकिल्ल्यातच खासदार विरोधकांकडून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आतापासूनच दिसून येत आहे.

Sangli Lok Sabha Elections 2024 News
Shirdi News: थोरात, आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका; विखेंनी सुनावलं, काँग्रेसच्या विरोधात तुम्ही...

मागील निवडणुकीनंतर विशाल पाटील यांचा जनसंपर्क काहीसा कमी झाला होता. पाटील हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे करीत होते, परंतु सामान्य मतदारांची नाळ तुटली होती. स्वतः विशाल यांनीही गावागावांत जाऊन संपर्क साधून प्रश्नांवर चर्चा करीत आहेत. आता त्यांच्या जोडीला पत्नी पूजा याही सक्रिय झाल्या आहेत. महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिला मतदारांत विशाल पाटलांच्या निवडणुकीतही साखर पेरणी करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

सेटलमेंटच्या राजकारणाला ब्रेक

मागील काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खासदार गट आणि आमदार गटात 'सेटलमेंट'चे राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले होते. बदलत्या राजकीय समीकरणात खासदार पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे विधानसभेला खासदार विरुद्ध आमदार गटात निकराचा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या वेळी सेटलमेंटच्या राजकारणाला फाटा देत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा अजेंडा अमलात आणण्यास सुरुवात केली आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Sangli Lok Sabha Elections 2024 News
Lok Sabha Elections 2024: निवडणुकीत कायद्याची काठी वाजणारच! एक कॅमेरा गावासाठी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com