Cm Uddhav Thackeray latest marathi News
Cm Uddhav Thackeray latest marathi News Sarkarnama
मुंबई

शिवसेनेवरील संकट अधिक गडद; आमदारांपाठोपाठ खासदारही नाराज?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. 35 पेक्षा जास्त आमदारांसह शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. शिंदे संध्याकाळी पाच वाजता ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आमदारांप्रमाणे शिवसेनेना खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित होते.

वर्षा निवास्थानावर बुधवारी दुपारी शिवसेना खासदारांची बैठक बौलावण्यात आली होती. या बैठकीला चार खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले. यामध्ये भावना गवळी (Bhavana Gawli), प्रताप जाधव (Pratap Jadhav), राजेंद्र गावित आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) अनुपस्थित होते. शिंदे यांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदे बैठकीला अनुपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, यामध्ये आता आणखी तीन खासदारांची भर पडली आहे. भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित शिवसेनेवर नाराज आहेत की अन्य कोणत्या कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. राज्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यापैकी बैठकीला 14 खासदार उपस्थित होते.

सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागले. शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचे समजते. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT