Rescue operation underway after a 17-year-old drowned during Ganesh Visarjan in Palghar’s Surya River. sarkarnama
मुंबई

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना, १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Palghar : गणेश विसर्जनातील आनंदात शोककळा; सूर्या नदीत खोल पाण्यात ओढल्या गेलेल्या १७ वर्षीय शिवराज गवळीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी शोधमोहीमेत सापडला

सरकारनामा ब्यूरो

निखिल मेस्त्री

Palghar News : गणेश विसर्जनासाठी सूर्या नदीत उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २०) कासा येथे घडली. शिवराज गवळी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत पाण्यात बुडणाऱ्या अन्य तिघांना स्थानिक जीवरक्षक, पोलिस आणि नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

चारोटी नाका येथील लोहार मित्र मंडळाची सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील विसर्जन घाटावर आणण्यात आली होती. विसर्जनावेळी काही भाविक मूर्तीसह नदीच्या खोल पात्रात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने चार ते पाच जण अचानक बुडू लागले.

घाटावर तैनात सुरक्षा कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले; मात्र शिवराज पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.अंधारामुळे रात्री शोधकार्यात अडथळे आले. सुमारे तीन ते चार तास शोध घेऊनही शिवराजचा ठावठिकाणा लागला नाही.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीत सापडला.

पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गणेश विसर्जनाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे कासा आणि चारोटी नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT