Eknath shinde sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड गोळीबार मोठी अपडेट; CM शिंदेंची पहिली रिअ‍ॅक्शन, म्हणाले...

Eknath shinde On Firing :मुख्यमंत्र्यांनी गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली

Pankaj Rodekar

Thane : शुक्रवारी रात्री भाजप आमदार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेना (शिंदे गट) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महेश आणि राहुल यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले आहेत. गायकवाड यांना पाहिल्यानंतर शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Ganpat Gaikwad Firing )

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.जखमी झालेले महेश गायकवा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पत्रक हॉस्पिटल प्रशासनाने काढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस ठाण्यात गोळीबार करत असलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की गणपत गायकवाड हे खुर्चीवर बसलेल्या महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार करत आहेत. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील आमदार गायकवाड यांनी पकडून मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT