Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाडांनी 'या' कारणामुळे केला महेश गायकवाडांवर गोळीबार

Sunil Balasaheb Dhumal

Kalyan Political News : उल्हासनगर येथे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा राडा झाला आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यात जखमी गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदारांनी थेट पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याचे कारणही समोर आले आहे.

उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्येच ही घटना घडली. आमदार गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) महेश आणि त्यांचे मित्र राहुल यांच्यावर सहा राऊंड फायर केले. त्यातील दोन गोळ्या महेश यांच्या अंगाला चाटून गेल्या तर दोन गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. इतर दोन गोळ्या राहुल पाटलांना लागल्या आहेत. पोलिस ठाण्यातील केबिनमध्ये अगदी जवळून झालेल्या गोळीबारामुळे गायकवाड आणि पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

जमिनीच्या वादातून गोळीबार?

आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर जमीनीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यात एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते.

त्यावर तोडगा काढण्यासाठीच आमदार गायकवाड यांचा मुलगा आणि महेश गायकवाड हिललाईन पोलिस ठाण्यात आले होते. तेथे त्यांच्यात पोलिसांसमोरच वाद सुरू होता. त्याचवेळी आमदार गायकवाड तेथे आले. त्यांनी पोलिस ठाण्यातच महेश आणि राहुल यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराने मुंबई ठाण्यासह मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी

गोळीबाराच्या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे कट्टर समर्थक असलेले महेश गायकवाड हे जखमी झाले आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT