Kalyan Dombivali News : सत्तेच्या मैदानावर उद्धव ठाकरेंना ‘क्लिन बोल्ड’करून मुख्यमंत्रिपद पटकावलेल्या एकनाथ शिंदेंचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. तर कल्याण डोंबिवली या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे आपला दबदबा वाढवत आहेत. आता 'सीएम' शिंदेंच्या साथीने राजकीय मैदानावर गुगली टाकणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी होमपिच कल्याणमध्ये 'क्रीडासंग्राम' भरवला आहे. या संग्रामात साऱ्याच राजकीय पक्षांचे नेते झुंजणार आहेत. म्हणजे, क्रिकेट स्पर्धेतून एकमेकांना भिडणार आहेत.
या संग्रामात शिवसेना अर्थात, शिंदेंची शिवसेना, मित्रपक्ष भाजप, ज्येष्ठ नेते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,जोडीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी, राज ठाकरेंची मनसे, काँग्रेसच्या दमदार नेत्यांना मैदानात उतरविण्याचा डॉ. श्रीकांत यांचा डाव आहे. तसेच, थेट प्रशासकीय अधिकारीही या स्पर्धांमध्ये उतरणार असल्याचेही समोर येत आहे.
परिणामी,या सगळ्यांना एकाचवेळी क्रिकेटच्या मैदानावर एकत्र आणून डॉ. श्रीकांत हे नेमका कोणाचा, कसा गेम करणार? त्यासाठी कशी गुगली टाकणार,कोणाची विकेट घेणार ? हे क्रीडासंग्रामातूनच कळणार आहे. मात्र, डॉ. श्रीकांत यांच्यापुढे ‘होमपिच’वरच मित्रपक्ष भाजप, दादांच्या राष्ट्रवादीच्या टीमचे ‘चॅलेंज’ राहणार असल्याचे नक्की आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवल्या आहेत. येत्या 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या क्रीडासंग्रामाचा नारळ फोडणार आहे. या 16 क्रीडा प्रकाराचे खेळविण्यात येणार असून क्रीडा स्पर्धांचा थरार रंगणार आहे. त्यात क्रिकेट,बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब जिमनॅस्टिक, चेस, रायफल शूटिंग, खो-खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल कॅरम, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफवर या खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष करुन या क्रिडासंग्रामाकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे. ज्या मध्ये सर्वच राजकीय पक्षांची टीम सहभागी हण्याची शक्यात आहे. त्यामुळे या क्रिडासंग्रामाला राजकीय स्वरुप निश्चितच राहणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच डोंबिवली शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात इव्हेंट भरविण्यात येत आहेत. त्यात यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) फ्रेंड्स लायब्ररीतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पुस्तक अदान -प्रदान या कार्यक्रमात मोठा हातभार लावल्याची चर्चा होती.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाण्यासाठी पोहोचणे खासदारांना सोपे होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे उद्घाटन होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याआधी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून वारकऱ्यांना एकत्र आणले होेते.
लोकसभा निवडणुकीची चर्चा असतानाच कल्याण लोकसभा निवडणूक ही शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदावार आहे? याची उत्सुकता आहे.
त्यातच खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये आम्ही तोडीस तोड असा उमेदवार देण्याची घेषणा केली आहे. त्यामुळे शिंदेंसमारे ठाकरे नेमके कुणाली संधी देणार? याची उत्सुकता आहे. अशातच क्रिडासंग्रामामुळे कल्याणमधील राजकीय माहोल गरम होणार, हे निश्चित आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.