Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला अटक, दोघेजण फरार

Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाडांसह तीन जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती.

Akshay Sabale

भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी ( 2 फेब्रुवारी ) पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेत महेश यांच्यासह रोहित पाटील गंभीर जखमी झाले. महेश आणि रोहित पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार गायकवाडांसह सहा जणांवर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार गायकवाडांसह तीन जणांना अटक करण्यात आली होती. तीन जण फरार होते. यातील एकाला ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली आहे. ( Ganpat Gaikwad Firing Latest Update )

गोळीबारानंतर आमदार गायकवाडांसह संदीप सरवणकर आणि हर्षल केने यांना अटक केली होती, तर आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि सहकारी नागेश बडेकर, विकी गणात्रा फरार होते. आता व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी विकी गणात्राला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव गायकवाड आणि सहकारी नागेश बडेकर हे दोघे अद्याप फरार आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून दोघांचा शोध घेतला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाडांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाडांवर ( Mahesh Gaikwad ) गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश यांच्यासह राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. जखमी गायकवाड आणि पाटील यांना कल्याणमधून शनिवारी रात्रीच ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

यानंतर डॉक्टरांनी तातडीनं दोघांवर शस्त्रक्रिया करून लागलेल्या गोळ्या काढल्या. यात महेश यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, तर पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. पण, मंगळवारी महेश यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यानं व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT