Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Gen-Z Protest : जेन-झीने एका पक्षाची अन् माणसाची दहशत संपविली; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भाजपवर निशाणा

Jitendra Awhad Criticized Bjp : भाजप आणि एका माणसाची दहशत झेन जी पोरांनी संपली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राहुल क्षीरसागर

Jitendra Awhad News : जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले? असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरूण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

झेन-जीने आपणा सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले,असे देखील ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या

आव्हाड म्हणाले, आपल्याला २०१४ पासून इन्कम टॅक्स, सी.बी.आय. आणि इडी या तीन संस्थांची भीती होती. मात्र, आपल्याकडे हरण्यासारखे काहीच नाही, याची जाणीव असलेल्या जेन-जी पिढीने आपण घाबरायचे कशाला? असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरूवात केली. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान अनेक तत्ववेत्त्यांनी सांगितले. मात्र, या तरूणांनी नवीनच तत्वज्ञान आपणाला शिकवले.

मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा अन् विचारायचा, अंकल, आज भी मारोगे? ह्या पिढीने सांगितले की,  दहशत संपवायची असेल, तर ती हास्य-विनोदाने संपवून टाका. या पोरांनी हास्य-विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली, असे देखील ते म्हणाले.

दादागिरी संपवली...

२०१४ साली आपल्याला व्हॉट्सॲप माहित नव्हते, फक्त भाजपला माहित होते. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सॲपवर फिरवलं. २०२६ ला अख्खं राजकारण व्हॉट्सॲप विरुद्ध इन्स्टावर आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसली आहेत, की त्यांनी व्हॉट्सॲपवाल्यांची दादगिरी संपुष्टात आली. या पुढे "जय भीम" हाच शब्द नमस्कार आणि हॅलो ऐवजी वापरला जाणार आहे.

काळ बदलतोय, वारा बदलतय...

मनोज प्रधान म्हणाले की, गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्याला असे वाटू लागले होते की, आपण रस्त्यावर उतरू शकत नाही, आपण भाजपवर टीका करू शकत नाही. 'झेन जी' हा जो शब्द आहे ना, त्यांनी दाखवून दिलंय की हे सगळं खोटं आहे. काळ बदलतोय, वारा बदललाय, त्या वार्‍याचा फायदा घ्यायला शिका. आपल्याला पुढच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 12 वरून 50 वर पोहोचायचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT