Girish Mahajan  Sarkarnama
मुंबई

Girish Mahajan BJP : निकटवर्तीय 'तुतारी'कडून लढण्याची शक्यता, तरीही 'संकटमोचक' महाजनांना भलताच 'कॉन्फिडन्स'

Akshay Sabale

Girish Mahajan News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी 'संकट मोचक' म्हणून मंत्री गिरीश महाजन पुढे येतात. मात्र, गिरीश महाजन विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघात 'संकटा'त सापडण्याची चिन्हे आहेत.

कारण, महाजन यांचे निकटवर्तीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांनी भाजपचा BJP राजीनामा देत 'तुतारी' हाती घेणार आहेत. खोपडे 'तुतारी'कडून हे महाजनांविरुद्ध निवडणूक लढू शकतात. या सर्व शक्यतांवर महाजन Girish Mahajan यांनी थोडक्यातच उत्तर दिलं आहे.

"निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत. त्यांची अवहेलना केली जात आहे," असं म्हणत दिलीप खोपडे यांनी भाजपला ( BJP ) 'रामराम' ठोकला आहे. जळगाव जिल्ह्याच्या भाजपचं नेतृत्त्व गिरीश महाजन करतात. एकप्रकारे महाजन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत खोपडेंनी हा निर्णय घेतला आहे.

दिलीप खोपडे हे मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय समजले जातात. ते 21 सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या उपस्थितीत 'तुतारी' हाती घेणार आहेत. जामनेर मतदारसंघातून दिलीप खोपडे यांना गिरीश महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) कडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गिरीश महाजन ( Girish Mahajan ) विरुद्ध दिलीप खोपडे, अशी तगडी 'फाइट' जामनेरमध्ये होऊ शकते. मात्र, तरीही गिरीश महाजन यांच्यात भलताच 'कॉन्फिडन्स' असल्याचं दिसून आला आहे. "कोणालाही येऊद्या. सगळे माझ्याविरोधात लढून थकले आहेत," अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

गिरीश महाजन म्हणाले, "घोडामैदान समोर आहे. सहा ते सातवेळा माझ्याविरोधात सगळे लढून थकले आहेत. कोणालाही येऊद्या. गंमत बघा. निकाल लागल्यावर माझ्याशी बोला. तोपर्यंत मी काही बोलणार नाही,"

राजीनामा देताना खोपडेंचे गंभीर आरोप?

"भाजपमध्ये सध्या केवळ पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्याला बदनाम करून मोठे होण्याची चढाओढ सुरू आहे. प्रत्येक गावात पक्षामध्ये दोन गट तयार केले जात आहेत. गेली 35 वर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केले. सध्याच्या पक्षांतर्गत स्थितीमुळे अस्वस्थ होऊन राजीनामा देत आहे. निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत. त्यांची अवहेलना केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT