Maharashtra Cabinet Decision: Sarkarnama
मुंबई

Cabinet Decision: कंत्राटी ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी! वेतनात मोठी वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचे दहा मोठे निर्णय

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.13 जून ) राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने 10 मोठे निर्णय घेतले आहेत. याचवेळी राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठीही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करत वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचे वेतन मिळत आहे. मात्र, यापुढे आता कंत्राटी ग्रामसेवकांना 16 हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबरोबरच शेतकऱ्यांसाठी देखील राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे सुधारित दराने मदत मिळणार आहे. यासाठी तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यापुढे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ होणार आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT