Dombivli News : डोंबिवलीत भाजपचे टेन्शन संपेना; आता पीडित महिलेचे उपोषण

BJP News : मानपाडा पोलीस ठाण्यासमोर पीडित महिलेचे उपोषण
Dombivli News
Dombivli NewsSarkarnama
Published on
Updated on

Dombivli politics News : भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या मुद्द्यावरुन भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली. बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील राजकीय वाद उफाळून आला होता. या वादात मुळ मुद्दा बाजूला पडल्याने पिडीत महिलेने उपोषण सुरु केले आहे.

चार दिवसांपासून पिडीत महिला मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर उपोषणास बसली आहे. 'पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही? असा सवाल या महिलेने केला असून जोशी यांना अटक होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरु असेल असे त्यांनी सांगितले.

Dombivli News
NCP News : विदर्भातील लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादी लक्ष केंद्रीत करणार; उद्या बैठकीत ठरणार...

नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. यावरुन भाजपने मानपाडा पोलिस (Police) ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करत बागडे यांच्या बदलीची मागणी केली. बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. बागडे यांना प्रशासन पाठीशी घालत आहे, असा आरोप भाजप करत आहे. भाजप मधील जुन्या कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

याला राजकीय पाठबळ असल्याचे सांगत भाजपच्या (BJP) बैठकीत कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या राजकीय वादात मुळ मुद्दा बाजूला पडत पडतो न पडतो तोच पिडीत उपोषणाची भूमिका घेतली आहे. सदर पीडित महिला गेल्या तीन चार दिवसांपासून मानपाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर उपोषणास बसली आहे.

Dombivli News
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी येथे चार दिवसापासून उपोषणाला बसली आहे. नंदू जोशी याला अटक करुन मला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. जोशी हे भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. माझ्या नवऱ्याचे ते मित्र असून त्यांचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु आहे.

त्यातून त्यांचे घरी येणे जाणे असायचे. पोलिस निरिक्षक बागडे यांना परत आणावे आणि जोशी यांना अटक व्हावी, ही माझी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच राज्य महिला आयोगाने माझी दखल घेत मला न्याय द्यावा. जोशी यांना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com