Jayant Patil Ashok Kharat Gopichand Padalkar .jpg Sarkarnama
मुंबई

Gopichand Padalkar News: जयंत पाटलांचं 'खरात कनेक्शन' समोर येताच सांगलीतला पराभव जिव्हारी लागलेले पडळकर झाले 'अ‍ॅक्टिव्ह'; म्हणाले...

Ashok Kharat Case: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर मंगळवारी (ता.23 मार्च) राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत.

Deepak Kulkarni

Mumbai News : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार. कोट्यवधींची जमवलेली माया, फसवणुकीचे गंभीर आरोप यांनी अशोक खरात प्रचंड अडचणीत आला आहे. नाशिक कोर्टानं त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीही सुनावली आहे. आता या प्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांबाबत खरात प्रकरणावरुन निशाणा साधताना एक हादरवणारा दावा केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर मंगळवारी (ता.23 मार्च) राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत.

गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्राला खूप मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. ही भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे. खरातनं अत्यंत घाणेरडे आणि चुकीचे काम केलं आहे. त्याला तर सरकारने बेड्या ठोकलेल्याच आहे.आपल्या सरकारनं खरात प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

आमदार पडळकर यांनी या अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक नवा दावा करताना काही चळवळीतील हिंदू कार्यकर्त्यांनी गेले एक ते दीडवर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचं सांगितलं. अत्यंत चुकीचं व घाणेरडं काम या खरातनं केलं आहे. त्याच्या कडक कारवाई करतानाच सरकारनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे सरकारचं आपण अभिनंदन करतो आहोत, असंही पडखळकरही यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करुन अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे, आम्ही कडक कारवाईच्या बाजूने आम्ही आहोत,असं यावेळी पडळकरांनी ठणकावून सांगितलं.

सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा झालेला करेक्ट कार्यक्रम आणि त्यापाठोपाठ आलेल्या अशोक खरात प्रकरणावरूनही आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांना यांनी डिवचलं, ते म्हणाले, जयंत पाटलांवर अशोक महाराजांची कृपा असल्यामुळे आमचं कसं काय चालणार..? एवढ्या मोठ्या महाराजाचा कृपाशीर्वाद जयंत पाटलांवर असेल, आणि त्यांचं *** प्राशन केलं असेल, तर प्रचंड मोठी ताकद जयंत पाटलांना मिळणारच ना... आता आम्ही त्यांच्यासमोर कसं टिकणार...असा उपरोधिक सवालही पडळकरांनी यावेळी केली.

मला तर अशी माहिती कळतेय की, जयंत पाटील आणि त्यांची मुलंही तिकडे जाऊन दोन दोन दिवस राहून पूजा केलेली आहे. मी तर त्या व्हिडीओची वाट पाहतोय की, जयंत पाटलांच्या डोक्यावर कलश ठेवून काय काय केलं आहे असा खोचक सवालही पडळकर यांनी केला.तसेच त्यांनी यावेळी मला तर जयंत पाटलांना या खरात महाराजानं रक्तानं अंघोळही घातल्याचं कळतंय असा खळबळजनक दावाही केला आहे.

जयंत पाटील यांनी अशोक खरातला ईश्वरपूर येथे आणले होते. तेथे खरातने काय कार्यक्रम केले, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री असतानाच खरातच्या घर आणि संस्थेला दारणा धरणातून 40 किलोमीटर लांबीची पाईपलाइन आणि पाणी देण्यात आल्याचंही पडळकर यांनी सांगितलं. तसेच या निर्णयामागची पाटील यांची भूमिका तपासावी, अशी मागणीही पडळकरांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT