

Satara ZP : यशवंत विचारांचा सुसंस्कृत राजकीय वारसा असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत पालकमंत्री, खासदारांना धक्काबुक्की आणि सदस्यांना अटक करून मतदानापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना जिल्ह्याच्या दृष्टीने निदंनीय असून, प्रशासनाने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची फेर निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रतोद सह्याद्री कदम यांनी केली. फलटणमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सदस्य गिरीश बनकर, वैशाली कांबळे, रूपाली सरगर, ज्योती मोरे उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषदेतील राड्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सह्याद्री कदम म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली होती. सर्व ठिकाणी भाजपच्या विरोधात निवडणूक लढली. सत्ता स्थापण्यासाठी युतीकडे ३७ सदस्यांचे पाठबळ होते, तर भाजपकडे मॅजिक फिगर गाठण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसताना त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस महासंचालक व अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता, तरी भाजपने पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना अटक करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले; परंतु ज्यांच्या अपहरणाचा गुन्हा त्यांच्यावर होता. ते सदस्य बापूसाहेब शिंदे मात्र हजर होते. मी शिवसेना पक्षाचा प्रतोद असल्याने मला व्हीप बजावण्याचा अधिकार असताना आमच्या दोन सदस्यांनी त्याचे उल्लंघन केले, अशी खंतही कदम यांनी व्यक्त केली.
वैशाली कांबळे म्हणाल्या, ‘‘सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवेशास मनाई असताना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरील कक्षात भाजप पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना प्रवेश कसा काय दिला. राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे यांना सभागृहातच धक्काबुक्की करणे, धमकावण्याचे प्रयत्न सुरू होते. कांबळे यांना भाजप सदस्यांच्या बाजूला बसवण्यात आले. आम्ही गोंधळही केला, की आमच्या सदस्याला त्याठिकाणी का बसवत आहात. आमचे कोणीही ऐकून घेतले नाही. त्यांचा जबरदस्तीने हात वर केला जात होता. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले.
जिल्हाधिकाऱ्यांची कृती संशयास्पद :
सभागृहात मतदानावेळी राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे यांनी पहिल्या वेळेस हातवर केला नाही, तसेच सहीही केली नाही. त्यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील हे पुन्हा पुन्हा "अजून कोणाला हात वर करायचा आहे का?" असे विचारत होते. जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती संशयास्पद आहे. लोकशाहीला गाडून टाकणाऱ्या घटना घडत असतील, तर लोकशाही जिवंत राहणार का असा प्रश्न गिरीश बनकर यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.